''काळा दिवस पाळणारे आता येतात अन् भेटून जातात, पण फोटो काढला म्हणजे पाठिंबा दिला असं नाही''
Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील अनेक नेते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी घेत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर मनोज जरांगेंनी टीका केली होती.
Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील अनेक नेते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी घेत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर मनोज जरांगेंनी टीका केली होती. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी काळा दिवस पाळला होता. शिवाय, मनोज जरांगेंचा (Manoj Jarange Patil) निषेधही केला होता. मात्र, तेच नेते आता निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंची भेट घेत आहेत. यावर आता मनोज जरांगे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जरांगेंची भेट घेतली होती.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
काही लोकांनी त्यांच्या नेत्यांना बोललो म्हणून काळा दिवस पाळला, पण आई बहिणीवर हल्ला झाला तर यांनी काळा दिवस नाही पाळला. तेव्हा त्यांच्या डोळ्याला पाणी आले नाही.आता सगळे येतात फोटो काढून जातात. आले भेटले आजारपणाची विचारपुस केली. लय दिवसाने का होईना पण आले. हे येतील ते त्यांच्या स्वार्थासाठी मी पाठिंबा कोणालाही दिला नाही. माझा महायुतीलाही पाठिंबा नाही आणि महाविकास आघाडीलाही पाठिंबा नाही. मी फक्त मराठा समाजाच्या बाजूने आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
मी मराठ्यांच्या आणि गोरगरिबांच्या बाजूने आहे
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मी राष्ट्रपती आला तरी त्याला पाठिंबा देत नाही. मी मराठ्यांच्या आणि गोरगरिबांच्या बाजूने आहे. सगळे येतात आणि फोटो काढून जातात फोटोचा अर्थ पाठिंबा दिला असं कोणीही गृहीत धरायचं नाही. तुम्हाला ज्याला पाडायचे त्याला पडायला निवडून आणायचे त्याला आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
आजारी पडून देखील खूप दिवस झाले आहेत
जय पवार यांच्या भेटीवर म्हणून जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक जण आपल्या स्वार्थासाठी येथील मी महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला नसून मी फक्त गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने आहे. राष्ट्रपती आली तरी मी त्यांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केलीय. दरम्यान जय पवार यांनी आजारपणाची विचारपूस केली. मात्र आपण आजारी पडून देखील खूप दिवस झाले आहेत, ते उशिरा का होईना आले म्हणत जरांगे यांनी मिश्किल चिमटा देखील काढला.
इतर महत्वाच्या बातम्या