एक्स्प्लोर

अगं बया बया बया... मैदान फुल्ल, चारही मार्ग लॉक, बीडजवळ रस्ते जाम; जरांगेंच्या भाषणाची 'अशी' सुरुवात

मीडियाच्या बांधवांनी जरा गर्दीकडे कॅमेरे फिरवावेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मेळाव्यासाठी जमलेल्या गर्दीवरुनच ओबीसीमधील काही नेत्यांना व राज्य सरकारला इशारा दिलाय

बीड : जिल्ह्यातील नारायण गडावर यंदा पहिल्यांदाच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून मराठा समाज बांधव नारायण गडावर मेळाव्यासाठी जमले आहेत. मनोज जरागे यांनी भाषणाची सुरुवात करतानाच अग बया बया बया.. असे म्हणत नारायण गडावर नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी असल्याचं म्हटलं. तसेच, मी आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो, असेही ते म्हणाले. नारायणगडावरील (Narayangad) मेळाव्याला मैदान फुल्ल भरलं असून काही तासांपूर्वी बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी ते नारायणगड अशी  30 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. बीडकडे येणाऱ्या चारही मार्गावर चक्का जाम झाला असून नारायण गडावरील मैदान मेळाव्यासाठी आलेल्या गर्दीने फुलून गेलंय. मला खरंच वाटलं नव्हतं की, नजर फिरेल इथपर्यंत तुम्ही येताल. एकजण म्हणत होता, हाहहाहा 500 एकर असतंय का, पण, गर्दी पाहून त्यांचा कार्यक्रमच होईल. 

मीडियाच्या बांधवांनी जरा गर्दीकडे कॅमेरे फिरवावेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मेळाव्यासाठी जमलेल्या गर्दीवरुनच ओबीसीमधील काही नेत्यांना व राज्य सरकारला इशारा दिलाय. बीडच्या पाठीमागे सगळे रस्ते जाम आहेत, 500 एकर परिसरात सगळं मैदान भरलंय. मी तुमच्यासमोर आज नतमस्तक होतो, एवढी गर्दी पाहून, नजर जाईल तिथपर्यंत मराठ्यांचा समुद्रच आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटंलय. एका दु:खाकडून या समुदायाला सुखाकडे जायचंय. या समुदायाकडे संस्कार आहेत, ते संस्कार कधीही जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय या राज्यावरती समुद्रासारखा पसरलाय. पण, कधीच या मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही, प्रत्येकाला साथ देण्याचं काम या समुदायाने केलंय. या समुदायाने कधीच जातीवाद केला नाही, आणि जात त्यांना शिवलीदेखील नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचे राज्यातील अस्तित्व यावर भाष्य केलं. 

राज्य सरकारने 14 महिन्यात एकही मागणी मान्य केली नाही, उभा राहिण्याचे दिवस जवळ आले आहेत, काहीही होऊ शकते वेळेवर काहीही ठरवलं तर त्यावर चालायचं, असे म्हणत मराठा समाजाला मनोज जरांगे यांनी तयारीला लागा, असे आदेशच दिले आहेत. तसेच, मराठा समाजाचा एवढा द्वेष का? आता 17 जाती घालताना गोरगरीब ओबीसींचा विचार का केला नाही. आधीच भरपूर असल्याने तुम्ही येऊ नका म्हणतात, तुम्ही काल मोठ्या 17 जाती ओबीसी आरक्षणात घातल्या, आता तुमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?, असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. एकजण म्हणाला महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, मगच आरक्षण देतो. आता 17 जाती घालताना तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतले का?, असा सवाल करत नाव न घेता फडणवीसांवर टीका केली.

उखडून फेकावेच लागेल

तुमच्या मुलाचे मुडदे कोण पाडत आहे, तुम्ही कितीही आंदोलन करा, कितीही कोटीच्या संख्येने या, आम्ही तुमच्या छातीवर बसून त्यांचा निर्णय घेतला. तुम्हाला काय करायचं करून घ्या अशी त्यांनी खुन्नस दिली आहे, त्यामुळे उखडून फेकावेच लागणार आहे, त्याशिवाय सुट्टी नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 

हेही वाचा

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मेळाव्याला किती गर्दी?; ड्रोनशूटचे फोटो पाहून उंचावतील भुवया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्सWalmik Karad Mother : वाल्मीक कराडच्या आईची तब्येत बिघडली,रुग्णालयात दाखल करायला सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Embed widget