Jadi Chamdi: 'जाडी चामडी चमकते युतीची लकलका...', विधानसभेच्या तोंडावर शरद पवार गटाचं पॅरेडी साँग तुफान व्हायरल
सध्या सोशल मिडीयावर महायुतीच्या महान अपयशानंतर सादर करतोय जाडी चामडी चमकते युतीची लका लका असं लिहित महायुतीतील महत्वाच्या नेत्यांवर खरपूस टीका करण्यात आली आहे.
![Jadi Chamdi: 'जाडी चामडी चमकते युतीची लकलका...', विधानसभेच्या तोंडावर शरद पवार गटाचं पॅरेडी साँग तुफान व्हायरल Maharshtra Politics Jadi Chamdi chamakte yutichi song viral launched by Maharshtra congress before Maharashtra Assembly election Jadi Chamdi: 'जाडी चामडी चमकते युतीची लकलका...', विधानसभेच्या तोंडावर शरद पवार गटाचं पॅरेडी साँग तुफान व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/07/933dc750a6bce2d98720073568a0c3061728293326704954_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra politics: विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येतायत तसतसं प्रचाराची गाणी यायला सुरुवात झाली आहे. जनमानसाच्या तोंडी रेंगाळणारे पक्षाच्या प्रचारगीतानं मतदानात फरक पडतो याची अनेक उदाहरणं माहिती असलेल्या नेतेमंडळींनी आता पॅरेडी साँग्समधून विरोधाची तार छेडायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आसुरांचा संहार कराया मशाल दे हाती हे मशालीचा पुरस्कार करणारं गाणं व्हायरल झाल्यानंतर आता शरद पवार गटानं महायुतीवर जाडी चामडी चमकते युतीची लका लका... असं पॅरेडी साँग पोस्ट करत वर्मावर बोट ठेवल्याचं दिसतंय.
सध्या सोशल मिडीयावर महायुतीच्या महान अपयशानंतर सादर करतोय जाडी चामडी चमकते युतीची लका लका असं लिहित महायुतीतील महत्वाच्या नेत्यांवर खरपूस टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसनं हे नवीन गाणं लाँच केलं आहे. या गाण्याची सगळीकडे एकच चर्चा असून या गाण्याला अनेक नेते रिपोस्टही करत आहेत.
काँग्रेसनेत्यांनी जाडी चामडी केली रिपोस्ट
भष्टाचार आणि फोडाफोडीची करून लफडी महायुतीची झाली जाडी चामडी असं लिहीत काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांनी ही गाणं रिपोस्ट केलं आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटरपेजवरून ही पोस्ट त्यांनी केली आहे. लका लका लेका लागली लंका, महाराष्ट्रातील भ्रष्टयुती सरकारचे कारनामे उघडकीस आणणारं जाडी चामडी गाणं प्रसारित करतो आहोत असं लिहित काँग्रेसकडून हे गाणं अनेकांनी शेअर, पोस्ट केलं आहे.
भ्रष्टाचार आणि फोडाफोडीची करून लफडी,
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 7, 2024
महायुतीची झाली जाडी चामडी,#गद्दारांची_जाडी_चामडी #भ्रष्टयुतीची_जाडी_चामडी pic.twitter.com/KBSxNT3trB
काय आहेत गाण्याचे बोल?
व्हायरल झालेल्या या गाण्याचे बोल तांबडी चामडी या गाण्याच्या चालीवर आहेत. जाडी चामडी चमकते युतीची लका लका लका असे या गाण्याचे बोल आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 50 खोके, उपमुख्यमंत्री अजित पवारांवर झाकलेत गुलाबी रंगात उडवतोय काकानी दिलेलं हक्कानं तर पद्धतशीर कारागीर अनाजी पंतांचा मारलाय रंधा असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या गाण्यात सडकून टीका करण्यात आली आहे.
जाडी चामडी चमकते युतीची! pic.twitter.com/MWMuztewfu
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 7, 2024
जाडी चामडी तुफान व्हायरल
महायुतीच्या कामावर बोट ठेवणारे जाडी चामडी चमकते युतीची लका लका... हे महाराष्ट्र काँग्रेसनं प्रसारित केलेलं गाणं सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झालं आहे. शिवसेना उबाठा गटासहीत महाराष्ट्र काँग्रेसच्या तसेच तेलंगणा युथ काँग्रेसच्या सर्व अकाउंटवरून हे गाणं सोशल मिडियावर चांगलंच फिरतंय.
बेरोजगारी, भ्रष्ट्राचार, घोटाळे मुद्द्यांवर टाकलाय प्रकाश
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस- अजित पवार यांना घेरण्याची तयारी काँग्रेसकडून सुरु करण्यात आली असून बेरोजगारी, उद्योगधंदे पळवून नेणे, भ्रष्टाचार, घोटाळे अशा अनेक मुद्द्यांवर या गाण्यात प्रकाश टाकण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)