Prakash Ambedkar : वंचितची मविआसोबत अद्याप युती नाही, इतर पक्षांच्या बैठकीला हजर राहू नका; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन
Lok Sabha Election 2024 : वंचित आघाडीची मविआसोबत अद्याप युती झालेली नाही, त्यामुळे इतर पक्षांच्या बैठकीला हजर राहू नका, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहू नका, वंचित आघाडीची महाविकास आघाडीसोबत (MVA) अद्याप युती नाही, असं वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती झाली नाही, त्यामुळे इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला बोलवत असतील तरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे इतर पक्षांच्या बैठकीला हजर राहू नका, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
वंचित आघाडीची मविआसोबत अद्याप युती नाही
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटर म्हणजेच आताच एक्स मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टसोबत व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाही. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये.
वंचित आघाडीची सोशल मीडिया पोस्ट
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 2, 2024
तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये.
ॲड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या… pic.twitter.com/6Y8jrM9qgp