एक्स्प्लोर

Eknath Shinde: एकनाथ शिंदे आपल्याच शिलेदारांमुळे चक्रव्यूहात अडकले; भुमरे, खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत, नेमकं प्रकरण काय?

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचे शिलेदार अडचणीत आले आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीचा दौरा केल्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या अडचणी सध्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. संजय गायकवाड संजय शिरसाट, अर्जुन खोतकर आणि संदिपान भुमरे यांची एका मागून एक प्रकरण समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, तर एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिलेदार अडचणीत आले आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी अचानक केलेला दिल्लीचा दौरा यामुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे राज्यातील घडामोडी, शिलेदारांवर आलेली संक्रात आणि अचानक केलेली दिल्लीवारी यामुळे एकनाथ शिंदे चांगलेच चर्चेत आले आहेत. या सर्व आरोपांमुळे एकनाथ शिंदे यांचा पक्ष अडचणीत आला आहे. (Eknath Shinde) 

संजय शिरसाट 

विट्स हॉटेल प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीच्या आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संजय शिरसाठ यांना आयकर विभागाची नोटीस आली त्यानंतर त्यांचा नोटांनी भरलेल्या बॅंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्यानंतर शिरसाट यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेचा शेजारी बसलेला व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत आहेत आणि या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं दिसत आहे. तर एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे. 

अर्जुन खोतकर 

अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक थांबलेल्या विश्रामगृहात कोट्यावधी रुपये आढळल्याने खळबळ उडाली. त्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्याच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर खोतकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

संजय गायकवाड 

कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने आणि कृतीने चर्चेत येणारे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईमध्ये आकाशवाणी आमदार निवास मधील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्याचबरोबर अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. मोठ्या गदारोळ्यानंतर गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र मी केलं ते योग्यच केलं किती गुन्हे दाखल झाले तरी आय डोन्ट केअर असं म्हणत गायकवाड यांनी आपल्या वागण्यावरती स्पष्टीकरण दिलं आहे. 

आमदार गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये जेवणं मागवलं होतं. वरण आणि भाताचा पहिला घास खाल्यावरच त्यांना ते खराब असल्याचं लक्षात आलं. त्याच संतापत त्यांनी खाली कॅन्टिनमध्ये जात 'मला विष खायला घालतो का' असं विचारलं आणि कॅन्टिनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि संजय गायकवाड यांनी त्याला बुक्क्यांनी मारहाण केली.

संदिपान भुमरे 

शिंदे गटाचे शिलेदार संदिपान भुमरे यांच्यावरती मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आपल्या भाऊजयीला दारू परवाना मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या दारू परवाना प्रकरणी छत्रपती संभाजी नगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाकडून संबंधित अधिकाऱ्यांना नोटीसा देखील पाठवण्यात आली आहेत.

शिंदेंनी संजय शिरसाट अन् संजय गायकवाडांना कडक शब्दात सांगितले

सदर प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावर तीव्र नाराज असल्याची चर्चा आहे. संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे एकनाथ शिंदेंनी कडक शब्दात कान टोचल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री आणि आमदारांच्या वेशिस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळत आहे. त्यामुळे असा बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याची ताकीद एकनाथ शिंदेंनी दिली आहे. 

एकनाथ शिंदे आपल्याच शिलेदारांमुळे चक्रव्यूहात अडकले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याच शिलेदारांमुळे चक्रव्यूहात सापडलेत. गेल्या तीन दिवसांत शिंदेंच्या तीन मंत्र्यांनी आपल्या कारनाम्यांनी सरकारमध्ये शिंदेंची कोंडी केलीय. संजय गाकवाडांनी आमदार निवासातल्या कॅन्टिनमध्ये गुंडगिरी केली. त्यानंतर शंभूराज देसाईंनी भर सभागृहात शिवराळ भाषा वापरत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांना धमकी दिली. आणि त्याचवेळी आधी आयकर विभागाच्या नोटीशीमुळे आणि दुसऱ्या दिवशी नोटांच्या बंडलाच्या व्हिडीओमुळे संजय शिरसाट अडचणीत आलेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड

व्हिडीओ

Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Embed widget