एक्स्प्लोर

Maharashtra Politics: महायुतीत 'त्या' घटनेनंतर नाराजीचा मोठा अंडरकरंट; फडणवीसांवर रागावून शिंदे-अजितदादा कार्यक्रम सोडून निघून गेले?

Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्तारावेळची असो किंवा मग अन्य कोणत्या तरी कारणामुळे आणि या सगळ्या नाराजीनाट्याच्या केंद्रस्थानी राहिलेले दोन महत्वाचे चेहरे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार...

Maharashtra Politics मुंबई: चैत्यभूमी येथील 14 एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमातील नाराजीनाट्याचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये धुसफूस नाही तर सगळं खुशखुश आहे असा दावा करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा एकदा नाराज झाल्याचं कळतंय. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंप्रमाणे दोन नंबरचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील खट्टू झाल्याचं कळतंय. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं होणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना भाषणाची संधी मिळालीच नाही. अजित पवार तर राज्यापाल जाण्याआधीच कार्यक्रमातून निघून गेले. तर एकनाथ शिंदे देखील कार्यक्रमानंतर तडकाफडकी ठाण्याला गेल्याची माहिती समोर आली. आपल्या नेत्याला भाषणाची संधी न मिळाल्यानं शिंदे समर्थक देखील नाराज झालेत. ऐनवेळी कार्यक्रमाच्या नियोजनात कुणी बदल केला असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. 

एकनाथ शिंदेंनी घेतली होती अमित शाह यांची भेट-

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 13 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील रायगड दौऱ्यावर आले होते. याआधी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी अमित शाह यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अन्य कोणीही नव्हते. अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी तब्बल अर्धा तास वन टू वन चर्चा केली. एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासोबतच्या या भेटीत काही मुद्द्यांवरुन आपली नाराजी व्यक्त केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर निधीवाटपावरुन नाराजी व्यक्त केली होती. अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याची बाब शिंदे यांनी शहांच्या लक्षात आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. 

काळजी करू नका सगळं व्यवस्थित सुरुय- अजित पवार

अमित शहा असं काही बोलले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते तिकडं तक्रार करतील, असं वाटत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला ते बोलतील. तेवढे आमचे संबंध चांगले आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार व्यक्त केली. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजून निर्णय झाला नाही.  आपण काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित सुरु आहे. डीपीसीसाठी त्यांना जो काही निधी द्यायचा आहे, तो सुद्धा आम्ही दिला आहे. त्यावर मार्ग निघेल. मार्ग निघाल्या निघाल्या तुम्हाला सांगितलं जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले. 

संबंधित बातमी:

Ajit Pawar & Eknath Shinde: एकनाथ शिंदे हे अमित शाहांकडे तक्रार करतील, असं वाटत नाही, आमचे संबंध चांगले आहेत: अजित पवार

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US India Tariffs : भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल
भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल
Asia Cup : UAE चा ओमानवर विजय, भारत सुपर फोरमध्ये दाखल, अ गटातील समीकरण बदललं, पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर जाण्याचं संकट
UAE चा ओमानवर विजय, अ गटातील समीकरण बदललं, पाकिस्तानवर स्पर्धेबाहेर जाण्याचं संकट
Akola : रेल्वेतून उतरताना प्रवासी घसरला, गॅस कटरच्या सहाय्याने सुटका; अकोल्यात दीड तासांच्या थरारानंतर सुटकेचा निश्वास
रेल्वेतून उतरताना प्रवासी घसरला, गॅस कटरच्या सहाय्याने सुटका; अकोल्यात दीड तासांच्या थरारानंतर सुटकेचा निश्वास
PCB : आयसीसीच्या कोर्टात पीसीबीच्या पदरी निराशा, मॅच रेफरी हटवण्याची मागणी फेटाळली, सूर्या त्याच्या भूमिकेवर ठाम
आयसीसीच्या कोर्टात पीसीबीच्या पदरी निराशा, मॅच रेफरी हटवण्याची मागणी फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US India Tariffs : भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल
भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल
Asia Cup : UAE चा ओमानवर विजय, भारत सुपर फोरमध्ये दाखल, अ गटातील समीकरण बदललं, पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर जाण्याचं संकट
UAE चा ओमानवर विजय, अ गटातील समीकरण बदललं, पाकिस्तानवर स्पर्धेबाहेर जाण्याचं संकट
Akola : रेल्वेतून उतरताना प्रवासी घसरला, गॅस कटरच्या सहाय्याने सुटका; अकोल्यात दीड तासांच्या थरारानंतर सुटकेचा निश्वास
रेल्वेतून उतरताना प्रवासी घसरला, गॅस कटरच्या सहाय्याने सुटका; अकोल्यात दीड तासांच्या थरारानंतर सुटकेचा निश्वास
PCB : आयसीसीच्या कोर्टात पीसीबीच्या पदरी निराशा, मॅच रेफरी हटवण्याची मागणी फेटाळली, सूर्या त्याच्या भूमिकेवर ठाम
आयसीसीच्या कोर्टात पीसीबीच्या पदरी निराशा, मॅच रेफरी हटवण्याची मागणी फेटाळली
Raj Thackeray: मी भाषणात मांडलेला विषयच सिनेमात; राज ठाकरेंनी 'दशावतार' पाहिला, गंभीर विषयाचं कौतुक
मी भाषणात मांडलेला विषयच सिनेमात; राज ठाकरेंनी 'दशावतार' पाहिला, गंभीर विषयाचं कौतुक
Income Tax Department : आतापर्यंत किती करदात्यांनी आयटीआर भरला, आयकर विभागाकडून आकडेवारी जाहीर, वेबसाईटच्या अडचणींबाबत दिली अपडेट
आतापर्यंत किती करदात्यांनी आयटीआर भरला, आयकर विभागाकडून आकडेवारी जाहीर, वेबसाईटच्या अडचणींबाबत दिली अपडेट
Delhi Accident: BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, महिलेला अटक, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा
BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, महिलेला अटक, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा
CIBIL Score : कर्ज काढण्यासाठी आणि  क्रेडिट कार्डसाठी सिबील स्कोअर महत्त्वाचा, कर्ज मिळण्यासाठी किती स्कोअर गरजेचा? जाणून घ्या
CIBIL स्कोअर किती असला की कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळतं, सिबील स्कोअर मोफत कसा तपासायचा?जाणून घ्या
Embed widget