एक्स्प्लोर

Maharashtra Politics : भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढल्या, चंद्रशेखर बावनकुळे शिवतीर्थावर

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यानंतर आता भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्वागत केलं. त्यानंतर राज ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची वैयक्तिक चर्चा होणार आहे.

आगामी काळात मुंबईसह राज्यातील अनेक महापालिका निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 

भाजपच्या अनेक नेत्यांकडून राज ठाकरेंची भेट
खरंतर काल सकाळच्या सुमारास भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं बोललं जात होतं. परंतु दोघांनीही या भेटीबाबतचं वृत्त नाकारलं. त्यानंतर दुपारच्या सुमारास विनोद तावडे हे राज यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि त्यांच्यात खलबतं झाली. त्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. याआधी नितीन गडकरी, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का असेही तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

निवडणुकीच्या तोंडावर नवीन समीकरण?
शिवसेनेने साथ सोडल्यानंतर मनसे आणि भाजप युती होणार अशीच राज्यात चर्चा होती. याला आणखी खतपाणी मिळालं ते मनसेने भाजपला राज्यसभा, विधानपरिषद आणि शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे. त्यानंतर पुढे देखील हिच चर्चा कायम असल्याची पाहायला मिळालं. त्यातच गेल्या काही दिवसात भाजप आणि मनसे यांची जवळीक वाढली आहे त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही नवी समीकरणे जुळतात का याबद्दल चर्चा आहेत. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांना पूरक भूमिका बघायला मिळतात. हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यापासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक वाढली आहे. या आधी चंद्रकांत पाटील यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि मनसेच्या गोटात काही शिजतंय का? याची चर्चा रंगली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
Bachchan Family Net Worth : गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
Social Media Report Card : युट्यूबवर राहुल गांधींना सर्वाधिक पसंती; पीएम मोदींचे Youtube चॅनेल चौथ्या क्रमांकावर
युट्यूबवर राहुल गांधींना सर्वाधिक पसंती; पीएम मोदींचे Youtube चॅनेल चौथ्या क्रमांकावर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा दावाSanjay Shirsat on Sanjay Raut : शिरसाट स्वतः नाच्या, संजय राऊतांवर शिरसाटांची टीकाPM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची परभणी आणि नांदेडमध्ये सभाNarendra Modi Nanded Sabha : प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची नांदेडमध्ये सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
Bachchan Family Net Worth : गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
Social Media Report Card : युट्यूबवर राहुल गांधींना सर्वाधिक पसंती; पीएम मोदींचे Youtube चॅनेल चौथ्या क्रमांकावर
युट्यूबवर राहुल गांधींना सर्वाधिक पसंती; पीएम मोदींचे Youtube चॅनेल चौथ्या क्रमांकावर
Uddhav Thackeray : फडणवीस म्हणाले होते, आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी ग्रूम करतो, मी दिल्लीला जातो, उद्धव  ठाकरेंचा दावा
फडणवीस म्हणाले होते, आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी ग्रूम करतो, मी दिल्लीला जातो, उद्धव ठाकरेंचा दावा
Loksabha Election 2024 : '400 पारचा संकल्प अवघड', भाजपच्या दिग्गज नेत्याचे पीएम मोदींना पत्र; व्यक्त केली जाहीर नाराजी
'400 पारचा संकल्प अवघड', भाजपच्याच दिग्गज नेत्याचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र!
CSK vs LSG IPL 2024 MS Dhoni: सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
Summer Fashion : उन्हाळ्यात राहायचंय कूल अन् स्टायलिश! आऊटफिट्स निवडण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, टिप्स फॉलो करा
Summer Fashion : उन्हाळ्यात राहायचंय कूल अन् स्टायलिश! आऊटफिट्स निवडण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, टिप्स फॉलो करा
Embed widget