Dhananjay Munde : अजित पवार बीड दौऱ्यावर, पण धनंजय मुंडेंची गैरहजेरी, समोर आलं मोठं कारण
Dhananjay Munde :एकेकाळी बीडमध्ये धनंजय मुंडेंशिवाय अजितदादांचं पान हलत नव्हतं अन् आता... अजित पवारांच्या बीड दौऱ्यात धनुभाऊ गैहरजर, चर्चांना उधाण

बीड: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज(2 एप्रिल) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या या बीड जिल्ह्याच्या दौऱ्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे मात्र अनुपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रकृती ठीक नसल्याच्या कारणामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी कळवलंय. त्यांनी एक्स या समाज माध्यमांवर ट्विट करून त्या संदर्भातली माहिती दिली आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या या अनुपस्थितीमुळे अनेक राजकीय चर्चांना सध्या उधाण आलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहे. अलीकडेच कारागृहात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर अजित पवारांच्या या बीड जिल्ह्याच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बीड जिल्ह्याच्या प्रशासकीय बैठकीसाठी आज अजित पवार. दरम्यान संध्याकाळी साडेपाच वाजता एका सार्वजनिक कार्यक्रमातही अजित पवार आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील राजीनामा यानंतर नाराज असलेले धनंजय मुंडे प्रशासकीय बैठकीला हजर राहणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असतानाच स्वतः धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा करत, आपल्या अनुपस्थिती बद्दल माहिती दिली आहे. सोबतच आपल्या गैरहजेरीचे कारणही सांगितले आहे. मात्र एकेकाळी बीडमध्ये धनंजय मुंडे शिवाय अजित दादांचं पानही हलत नव्हतं, मात्र आता अजित पवारांच्या बीड दौऱ्यात धनुभाऊंची गैरहजेरी राजकीय वर्तुळातील अनेक चर्चांसाठी कारण ठरले आहे.
धनंजय मुंडे यांच्या गैरहजरी मागच नेमकं कारण काय?
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उपमुख्यंत्रांच्या या बीड जिल्ह्याच्या दौऱ्याला अनेक कारणांनी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच अजित दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे गैरहजर असणार आहे. आपल्या गैरहजेरीची माहिती आणि कारण स्वतः धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमांवर एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. त्यात ते म्हणाले आहे की, ` उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार साहेब यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यामध्ये मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीड मधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही याबाबत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून या संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती' अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय @AjitPawarSpeaks साहेब यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 2, 2025
अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त
उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिवसभर बीडच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या या दौरादरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शहराच्या विविध भागात अजित पवार बैठकांना उपस्थित राहणार असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे. याबरोबरच पक्ष पदाधिकाऱ्यांकडून देखील जोरदार तयारी करण्यात आली असून शहराच्या विविध भागात मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुलाबी रंगाची थीम कायमच ठेवली असल्याचे या बॅनर्स मधून दिसत आहे.























