एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Murder Case: पुढे-मागे गाड्या उभ्या करुन अडवले; काच फोडून संतोष देशमुखांना बाहेर खेचले; सुदर्शन घुलेने सांगितला अपहरणाचा थरार!

Santosh Deshmukh Murder Case: सुदर्शन घुलेने हत्यारे कशी तयार केलीत ते अपहरणापासून संतोष देशमुखांची हत्या कशी केली याबाबत सांगितलं.

Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) याने सीआयडीला दिलेल्या जबाब समोर आला आहे. कबुली जबाबामध्ये वाल्मिक कराडसाठी काम करणाऱ्या सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आता तोंड उघडलं आहे. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सुदर्शन घुलेने हत्यारे कशी तयार केलीत ते अपहरणापासून संतोष देशमुखांची हत्या कशी केली याबाबत सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या झाली हे जवळपास निश्चित झालं आहे. सुदर्शन घुलेने सीआयडीला दिलेल्या जबाबात सांगितले की, 9 डिसेंबर 2024 रोजी प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटेसह मी (सुदर्शन घुले) एकत्र आलो आणि संतोष देशमुखांच्या अपहरणाचा प्लॅन रचला. 

कारची काच फोडून संतोष देशमुखांना बाहेर काढले-

कृष्णा आंधळेने एक कार भाड्याने आणली होती. तसेच सुदर्शन घुलेकडे आधीपासून एक काळी जीप होती. संतोष देशमुख आणि त्यांचा मावसभाऊ कारमधून येत असल्याचे आम्हाला दिसताच एक मागे आणि दुसरी पुढे अशा दोन्ही गाड्या लावून त्यांना आम्ही रस्त्यावर अडविले. त्यानंतर दगडाने काच फोडून संतोष देशमुखांना कारमधून बाहेर काढले. संतोष देशमुखांच्यासोबत असणाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून उमरी टोलनाक्यावरुन संतोष देशमुखांचे अपहरण केले, असं सुदर्शन घुलेने सांगितले. 

टाकळी शिवारात नेऊन संतोष देशमुखांना मारहाण-

अपहरण केल्यानंतर टाकळी शिवारात नेऊन संतोष देशमुखांना मारहाण केली. यात संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्याचं सुदर्शन घुलेने जबाबात म्हटलं आहे. खंडणी न दिल्यानेच वाल्मीक कराड याने आडवा येणाऱ्याला आडवा करा असा निरोप दिला होता. त्याप्रमाणेच आम्ही सरपंच संतोष देशमुखांना मारहाण केली. याचवेळी विष्णू चाटे याला जयराम चाटेच्या फोनवरून दोन वेळेला बोलणं झाल्याची कबुली सुदर्शन घुलेने दिली आहे. 

वाल्मिक कराडच्या तुरुंगातून आणखी 3 कैद्यांना हलवलं

बीड जिल्हा कारागृहात 31 मार्च रोजी सकाळी कराड गँग आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचे समोर आलं होतं. महादवे गित्तेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर महादेव गित्तेसह इतर चार आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची आलं. महादेव गित्तेला पोलिस व्हॅनमधून नेत असताना त्याने ही माहिती दिली. मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीते यासह इतर चौघांना संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात हलवण्यात आले होते. दरम्यान, आज अक्षय आठवले यांच्यासह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आले.

संबंधित बातमी:

मोठी बातमी: कळंबमध्ये महिलेच्या मृतदेहासोबत दोन दिवस झोपला, तिसऱ्या दिवशी वास येऊ लागल्याने बाहेर पडला, आरोपीची थरारक कबुली

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Nagpur Accident: ई-बाईक खड्ड्यातून उसळली, अंजली थेट दुभाजकावर आदळली; तेवढ्यात मागून येणाऱ्या नागपूर मनपाच्या इलेक्ट्रिक बसनं चिरडलं, जागीच दुदैवी अंत
ई-बाईक खड्ड्यातून उसळली, अंजली थेट दुभाजकावर आदळली; तेवढ्यात मागून येणाऱ्या नागपूर मनपाच्या इलेक्ट्रिक बसनं चिरडलं, जागीच दुदैवी अंत
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: 'दादा, आता राखीसाठी कोणाला कॉल करू रे?’; कुणालच्या आत्यांच्या आक्रोशाने सर्वांचेच डोळे पाणावले
'दादा, आता राखीसाठी कोणाला कॉल करू रे?’; कुणालच्या आत्यांच्या आक्रोशाने सर्वांचेच डोळे पाणावले

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Embed widget