Raj Thackeray : राज ठाकरे जून महिन्यात छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर; बैठकांसह मेळावा घेणार
Raj Thackeray : आपल्या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे पक्षाच्या बैठका, मेळावा आणि नागरिकांशी संवाद देखील साधणार आहेत.
Raj Thackeray Aurangabad Tour: आगामी महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचे दौरे देखील वाढले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांच्या सभांवर सभा होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान अशातच मनसे देखील आता निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. तर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) जून महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान राज ठाकरे पक्षाच्या बैठका, मेळावा आणि नागरिकांशी संवाद देखील साधणार आहेत. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
राज्यातील आगामी विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जून महिन्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. राज ठाकरे यांनी राज्यातील मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक शुक्रवारी शिवतीर्थावर बोलावली होती. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर देखील उपस्थित होते. बैठकीत ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील पक्षाची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी छत्रपती संभाजीनगरची महानगर पालिका ताकदीने लढवणार असून त्याबाबतच्या सूचना त्यांनी पदाधिकऱ्यांना केल्या. तसेच राज ठाकरे जून महिन्यात छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार असून, पक्ष पदाधिकारी बैठक, मेळावा आणि नागरिकांशी संवाद साधणार आहे. याबाबत खांबेकर यांनी माहिती दिली.
आगामी निवडणुकीची तयारी...
राज्यात आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील सर्वच महत्वाचे पक्ष सध्या निवडणुकीची तयारी करत आहे. दरम्यान मनसे देखील आता निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. तर राज ठाकरे यांनी मुंबईत सर्वच जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष यांची बैठक घेतली आहे. तसेच या बैठकीत ज्या त्या जिल्हाध्यक्ष यांच्याकडून त्यांच्या जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. त्यामुळे मनसे देखील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागली असल्याचं पाहायला मिळत आहे.
मनसेकडून राज ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी...
राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरमधील पक्षाचा आढावा घेतला. तसेच जून महिन्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या स्थानिक नेत्यांकडून तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा दौरा पाहता स्थानिक पक्षाचे नेते पुन्हा एकदा सक्रीय होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: