(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Raj Thackeray : 'तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येतात?' राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सवाल
Nashik Raj Thackeray : 'जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता..याचं भान तुम्ही ठेवायला हवं, असा सल्ला राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
Nashik Raj Thackeray : शेतकरी हा देशाचाच नाही तर जगाचा पोशिंदा आहे, मात्र मागील काही वर्षात शेतकऱ्याला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. हे थांबलं पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचे आहे. तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येतात? असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला. जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता..याचं भान तुम्ही ठेवायला हवं, असा सल्लाही राज ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
माणसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवशीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज ते नाशिक शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसह विविध कार्यक्रमांना ते भेटी देणार आहेत. तत्पूर्वी आज सकाळी त्यांनी शेतकऱ्यांची बैठक (Farmers Meet) आयोजित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बँकेची सक्तीची वसुली, कांदा दर घसरण आणि ईतर विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन करत आवाज उठविल्याशिवाय शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळणार नाही, तुम्ही सर्वानी एकत्र येऊन हा लढा उभारणे आवश्यक असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, 'तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येतात? बैठकीला आलेल्या शेतकऱ्यांना प्रश्न केला. ज्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन दिले होते, त्यांनाच तुम्ही मतदान केलं ना? असे सांगत 'जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता..याचं भान तुम्ही ठेवायला हवं..' असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनी देखील राज ठाकरे यांचे म्हणणे ऐकून घेत 'शेतकरी सगळे आता तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांनी दिले. त्यावर येत्या तीन चार दिवसांत शेतकरी प्रतिनिधीना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी आश्वासन दिले.
राज ठाकरे नाशिकच्या मैदानात
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे नाशिकच्या मैदानात उतरले असून संघटनात्मक बांधणीसाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी तयारी केली जात आहे. सव्वा वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. मुंबई, नाशिक, पुणे या महत्त्वाच्या महापालिकांसह राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी राज ठाकरे प्रथम नाशिकच्या मैदानात उतरत आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे शाखाप्रमुख, विभागप्रमुख, शहर पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिश: चर्चा करणार आहेत. रविवारी क्रेडाईसह विविध संघटनांशी ते संवाद साधणार आहेत. या तीन दिवसांत ते नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगावसह छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांतील संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.