एक्स्प्लोर

Maharashtra Monsoon Assembly Session : '50 खोके एकदम ओक्के', विरोधकांची घोषणाबाजी; धनंजय मुंडेंच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं

Maharashtra Monsoon Assembly Session : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांनी शिंदे गटातील आमदारांना डिवचलं. तर धनंजय मुंडे यांच्या घोषणांनीही लक्ष वेधून घेतलं.

Maharashtra Monsoon Assembly Session : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक (Opposition) आक्रमक झाले. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी एकत्र येऊन विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली. तसंच यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

'50 खोके एकदम ओक्के', शिंदे गटातील आमदारांना डिवचलं
महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावेळी शिंदे गटातील आमदारांना डिवचलं. सभागृहात जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदार जवळ येताच '50 खोके, एकदम ओक्के', 'आले रे आले गद्दार आले', अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. 

'आशिष शेलार यांना पुन्हा मुंबई अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,' धनंजय मुंडेंच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं

Maharashtra Monsoon Assembly Session : '50 खोके एकदम ओक्के', विरोधकांची घोषणाबाजी; धनंजय मुंडेंच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं
तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं. ईडी सरकार हाय हाय, शेतकऱ्याला मदत न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, संजय शिरसाट यांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, सुधीरभाऊंना चांगलं खातं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ओला दुष्काळ जाहीर न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आशिष शेलार यांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. आशिष शेलार यांना पुन्हा मुंबई अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.

Maharashtra Monsoon Assembly Session आता सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत? : आदित्य ठाकरे

सभागृहाबाहेरच सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर येण्याआधीच सभागृहाबाहेरच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आणि त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. "या परिस्थिती शेतकरी, महिला यांच्या आवाजाचा कोणीच विचार करत नाही. स्वत:ला काय मिळालं, मिळालं नाही याचा विचार करत आहेत. या सरकारमध्ये अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही आणि मुंबईकरांना स्थान नाही. आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्यांच्याविरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच," अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य यांच्या टीकेला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं. "आदित्य ठाकरेंची भाषा अशोभनीय आहे. बेईमानी आणि लाचारी या शब्दांचा अर्थ समजायचा असेल तर मतं घ्यायची मोदीजींचा फोटो दाखवून आणि गोदीत जाऊन बसायचं सोनिया गांधी यांच्या, हे बेईमानी नाही का? लाचार या शब्दाचा अर्थ घ्यायचा असेल तर मदत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यायची आणि सत्तेची गोड फळं चाखण्यासाठी शरद पवारांच्या गोदीत बसायचं, याचा लाचारी म्हणत नाही का? आदित्यजी जरा अभ्यास करा, अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे वय आहे आणि मगच भाष्य करा," असं आशिष शेलार म्हणाले.

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांची विधान भवनाबाहेर तुफान घोषणाबाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur- Madha Lok Sabha: वंचितचे सोलापूर आणि माढा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार 'करोडपती', कोणाकडे किती  संपत्ती आणि दागिने?
वंचितचे सोलापूर आणि माढा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार 'करोडपती', कोणाकडे किती संपत्ती आणि दागिने?
Premachi Goshta Serial Update : कार्तिकची बाजू घेत इंद्रा मुक्ताच्या कानशिलात लगावणार; सावनी भरतेय सागरचे कान
कार्तिकची बाजू घेत इंद्रा मुक्ताच्या कानशिलात लगावणार; सावनी भरतेय सागरचे कान
Kolhapur News : कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत किती कोटींनी वाढ? माने की मंडलिक कोट्यधीश??
कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत किती कोटींनी वाढ? माने की मंडलिक कोट्यधीश??
BJP :  भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे
भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Balasaheb Thorat : सांगली आणि भिवंडीचा तिढा आजही कायम - बाळासाहेब थोरातVishal Patil PC FULL :सांगलीत मविआने मोठी चूक केली - विशाल पाटीलVishal Patil Sangli : प्रत्येक आरोपाला सभेतून उत्तर देणार - विशाल पाटीलABP Majha Headlines : 10AM  :16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur- Madha Lok Sabha: वंचितचे सोलापूर आणि माढा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार 'करोडपती', कोणाकडे किती  संपत्ती आणि दागिने?
वंचितचे सोलापूर आणि माढा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार 'करोडपती', कोणाकडे किती संपत्ती आणि दागिने?
Premachi Goshta Serial Update : कार्तिकची बाजू घेत इंद्रा मुक्ताच्या कानशिलात लगावणार; सावनी भरतेय सागरचे कान
कार्तिकची बाजू घेत इंद्रा मुक्ताच्या कानशिलात लगावणार; सावनी भरतेय सागरचे कान
Kolhapur News : कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत किती कोटींनी वाढ? माने की मंडलिक कोट्यधीश??
कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत किती कोटींनी वाढ? माने की मंडलिक कोट्यधीश??
BJP :  भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे
भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे
Stock Market Opening : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली
Lok Sabha 2024 : निवडणूक आयोग अलर्ट मोडवर! 4600 कोटी रुपये, कोट्यवधींची दारू जप्त
निवडणूक आयोग अलर्ट मोडवर! 4600 कोटी रुपये, कोट्यवधींची दारू जप्त
Kavya Maran RCB vs SRH: काव्या मारन त्या क्षणी लगेच उठली अन् नाचली; फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या
काव्या मारन त्या क्षणी लगेच उठली अन् नाचली; फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या
Travis Head: दिल्लीनं 11 वर्षांआधी 30 लाखांत खरेदी केलेलं,आता ट्रॅव्हिस हेडचा पगार किती?, जाणून घ्या सर्वकाही!
दिल्लीनं 11 वर्षांआधी 30 लाखांत खरेदी केलेलं, आता ट्रॅव्हिस हेडचा पगार किती?, जाणून घ्या
Embed widget