एक्स्प्लोर

Maharashtra Ministers Portfolio : नाराजीच्या चर्चेनंतर शिंदे गटातील आठ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्याची जबाबदारी 

Maharashtra Ministers Portfolio : खाते वाटपावर नाराज असल्याच्या चर्चेनंतर शिंदे गटातील आठ मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Ministers Portfolio : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं (Maharashtra Cabinet) खाते वाटप पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटात (Shinde Group) नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपल्या खात्याबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता शिंदे गटातील आठ मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी या आठ मंत्र्यांवर देण्यात आली आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 जणांचं हे मंत्रिमंडळ आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील आठ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

आठ मंत्र्यांकडील सध्याचं खातं आणि अतिरिक्त खातं

मंत्री                     सध्याचं खातं                                    अतिरिक्त खातं
उदय सामंत          उद्योग                                               माहिती आणि तंत्रज्ञान
शंभूराज देसाई      राज्य उत्पादन शुल्क                            परिवहन
दादा भुसे             बंदरे व खनिकर्म                                  पणन
संजय राठोड        अन्न व औषध प्रशासन                           सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
तानाजी सावंत       सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण       मृद व जलसंधारण
अब्दुल सत्तार        कृषी                                                  आपत्ती व्यवस्थापन
दीपक केसरकर  शालेय शिक्षण व मराठी भाषा                   पर्यावरण आणि वातावरणीय बदल
संदीपान भुमरे      रोजगार हमी योजना व फलोत्पादन          अल्पसंख्याक व औकाफ

Maharashtra Ministers Portfolio : नाराजीच्या चर्चेनंतर शिंदे गटातील आठ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्याची जबाबदारी 

मुख्यमंत्र्यांकडे सर्वाधिक खाती पण महत्त्वाची खाती फडणवीसांकडे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीनंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलं. खाते वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खाती जास्त आली असली तरी महत्त्वाची खाती ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्याचं दिसतं. मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन तसंच नगरविकास खात यासह इतर महत्त्वाची खाती आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ, ऊर्जा तसंच जलसंपदा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

इतर 18 मंत्र्यांची खाती 

1. राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

2. सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

3. चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

4. डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास

5. गिरीष महाजन - ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 

6. गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 

7. दादा भुसे - बंदरे व खनिकर्म 

8. संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन

9. सुरेश खाडे - कामगार

10. संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन

11. उदय सामंत - उद्योग

12. प्रा.तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

13. रवींद्र  चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

14. अब्दुल सत्तार - कृषी

15. दीपक केसरकर - शालेय शिक्षण व  मराठी भाषा

16. अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

17. शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क

18. मंगलप्रभात लोढा - पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : स्वबळाच्या नाऱ्यानं महाविकास आघाडीत वितुष्ट येईल का? संजय राऊत यांचं दोन शब्दात उत्तर, तर्क वितर्क थांबणार?
स्वबळाच्या नाऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, मविआच्या प्रश्नावर संजय राऊतांनी दोन शब्दात उत्तर देत सगळं स्पष्ट केलं
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : स्वबळाच्या नाऱ्यानं महाविकास आघाडीत वितुष्ट येईल का? संजय राऊत यांचं दोन शब्दात उत्तर, तर्क वितर्क थांबणार?
स्वबळाच्या नाऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, मविआच्या प्रश्नावर संजय राऊतांनी दोन शब्दात उत्तर देत सगळं स्पष्ट केलं
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
Embed widget