एक्स्प्लोर

पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; नागपुरातून नितीन गडकरी आज अर्ज दाखल करणार

Lok Sabha Election 2024 : नागपूरमधील (Nagpur News) भाजपचे (BJP) उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीकडून (Mahayuti) मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती असेल.

Maharashtra Lok Sabha Election 2024 : नागपूर : महाराष्ट्रातील (Maharashtra News) लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. नागपूरमधील (Nagpur News) भाजपचे (BJP) उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीकडून (Mahayuti) मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती असेल.

दरम्यान, चंद्रपूर लोकसभेच्या (Chandrapur Lok Sabha Election) रिंगणात उतरलेल्या सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. आज मुनगंटीवारांविरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी (Ramtek Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार राजू पारवे तर मविआच्या उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर भंडारा-गोंदियातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महायुती आणि मविआकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाईल. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर आज शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काल त्यांनी अर्जाचा एक संच गाजावाजा न करता दाखल केला. याशिवाय गडचिरोली-चिमूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे हे भाजपकडून अर्ज दाखल करणार 

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे हे भाजपकडून आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे हे काँग्रेस पक्षाकडून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणार आहेत. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेत्यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. दोन्ही उमेदवारांकडून भंडारा शहरात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

जात वैध्यता प्रमाणपत्राला घेऊन सध्या विवादात असलेल्या रामटेक लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे या आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यांच्या विरोधात नुकताच आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेलेले राजू पारवे मैदानात आहे. जात वैद्यता प्रमाणपत्रावर कितीही विवाद केला तरी माझा न्यायालयावर  विश्वास असल्याचे रश्मी बर्वे यांनी सांगितले. जिल्ह्या महायुतीला  उमेदवारच मिळाला नसल्याचे पक्ष फोडून उमेदवार उभा करावा लागला असा आरोप रश्मी बर्वे यांनी केला. आज आम्ही नामांकनानिमित्य शक्ती प्रदर्शन करून असे बर्वे यांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget