Maharashtra Live Blog Updates: बीडमधील राड्यानंतर लक्ष्मण हाके गेवराई पोलिसांना शरण जाणार?
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर मागण्या का मान्य नाही? असा सवालही मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. तर आमच्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत असं म्हणत मनोज जरांगेंना केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
लक्ष्मण हाके यांना गेवराईत येण्यापासून पोलिसांनी रोखलं
बीड : जिल्ह्यात लागू जमाबंदी आदेशाच्या पार्श्वभूमीवर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना गेवराई तालुक्यातील नागझरी गावाजवळ पोलिसांनी अडवलं. काल गेवराईत झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी हाके यांना नोटीस बजावली होती. त्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी ते गेवराईकडे निघाले होते. मात्र, कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना थांबवण्यात आलं असून, सध्या जालन्यातील वडीगोद्री येथे पोलीस आणि हाके यांच्यात चर्चा सुरू आहे. पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
नाशिकमध्ये लाडक्या बाप्पासाठी तब्बल वीस हजार रुपये किलोचे मोदक
नाशिक : लाडक्या गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही तास बाकी आहेत. नाशिकमध्ये सोने चांदीचे वर्क असलेले तब्बल वीस हजार रुपये किलोचे मोदक विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. नाशिकच्या सागर स्वीटमध्ये 25 पेक्षा जास्त प्रकारचे मोदक खरेदी करण्यासाठी नाशिककर देखील गर्दी करत आहे. लाडक्या बाप्पाला विविध प्रकारचा नैवेद्य दिला जातो आणि त्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे गणपतीचा आवडीचा असलेला सोने आणि चांदीचा मोदक नाशिककरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.























