Maharashtra Karnataka Border Dispute : अध्यक्ष महोदय, तुम्ही इंग्रजी माध्यमाचे, पण सीमाप्रश्नी ठरावात अनेक चुका, दादांचं व्याकरणावर बोट, फडणवीस म्हणाले...
Maharashtra Karnataka Border Dispute : अध्यक्ष महोदय, तुम्ही इंग्रजी माध्यमाचे, पण सीमाप्रश्नी ठरावात अनेक चुका, दादांचं व्याकरणावर बोट, फडणवीस म्हणाले...
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरील ठरावामध्ये 865 गावांचा उल्लेख केला आहे. मात्र त्यामध्ये बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी या शहरांसह सर्व गावांचा उल्लेख करावा ही ठरावात असलेली चूक विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान या ठरावात व्याकरण चुका असून चुकीच्या पद्धतीने ठराव मांडला जाऊ नये यासाठी तो व्यवस्थित दुरुस्त करुन सभागृहात मांडावा अशी सूचनाही अजित पवार यांनी केली.
"सीमाभाग ठरावात अनेक चुका आहेत. अध्यक्षमहोदय आपण इंग्रजी माध्यमांचे आहेत. यात अनेक वाक्यरचना चुकीच्या आहेत. याचा संदर्भ उद्या कोर्टातही उपस्थित केला जाऊ शकतो. मराठीची तोडमोड करुन हा ठराव नको. यात सुधारणा करण्यात यावा," अशी सूचना अजित पवार यांनी केली.
Maharashtra Karnataka Border Dispute : व्याकरणांच्या चुकांचा न्यायालयात परिणाम नाही : देवेंद्र फडणवीस
यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "सकाळी हा ठराव दाखवला होता. यात काही व्याकरणाच्या चुका आहेत. त्या सुधारल्या जातील. मात्र व्याकरणाच्या चुकांचा न्यायालयात काही परिणाम होत नाही.
कोर्टात सर्वात दीर्घकाळ लढा सुरु आहे. कोर्टाचा निकाल येईपर्यंत केंद्रशासित प्रदेश करावा अशी आम्ही मागणी करत आहोत, असं भास्कर जाधव म्हणाले. त्यावर कोर्टात ही केस सुरु आहे. त्यामुळे कंटेम्प्ट होणार नाही याचीही खात्री केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने हा विषय ठराव क्लोज केला आहे. त्यामुळे आपल्याला यात हा मुद्दा टाकता येणार नाही, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं.
Maharashtra Karnataka Border Dispute : विधानसभेत सीमाप्रश्नी ठराव एकमताने मंजूर
महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सीमावादाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सीमाप्रश्नाच्या ठरावाचं वाचन केलं. कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच अन् इंच जागा महाराष्ट्राचीच असून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने आणि सर्व ताकदीनिशी उभे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने बेळगाव सीमा प्रश्नावर ठराव करण्याची मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्राच्या विधानसभेने कर्नाटक प्रशासनाच्या मराठीविरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
VIDEO : Ajit Pawar Vidhan Sabha Speech : इंग्रजी, मराठी, व्याकरण आणि सीमावादावर ठराव; अजित पवार काय म्हणाले?
संबंधित बातमी