Devendra Fadnavis: महाराष्ट्र गुजरात तुलना, उद्योग, इंडस्ट्रीयल मॅग्नेट अन् आकडेवारीसह फडणवीसांचं विरोधकांना उत्तर, नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis: जसं ईव्हीएम आहे, तसंच काही मिळालं नाही की, मग महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले म्हणायचं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं आहे.
नागपूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (गुरुवारी) विधानसभेतील आपलं पहिलं भाषण केलं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यात आलेल्या उद्योगांवरती सखोल भाष्य केलं आहे. त्यांनी यावेळी सभागृहात बोलताना आत्तापर्यंत राज्यात आलेल्या प्रकल्पाबाबत विरोधकांना सर्व माहिती दिली आहे. सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जसं ईव्हीएम आहे, तसंच काही मिळालं नाही की, मग महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले म्हणायचं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं आहे.
काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?
गुजरात राज्य जाहीराती कशाला देतं, आपले विरोधक रोज सांगतात गुजरात चांगलं आहे, हे रोज प्रचार आणि प्रसार करत आहेत, सर्व उद्योग तिकडेच चाललेत म्हणून, काही काळजी करू नका, महाराष्ट्र कालही एक नंबर होता, आजही एक नंबर आहे आणि उद्याही एक नंबर राहिलं. महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. महाराष्ट्राची आपली एक ताकद आहे आणि एक लक्षात ठेवा देशामध्ये आज दहा राज्य स्पर्धा करत आहेत. तो जमाना गेला, जेव्हा दोन ते तीन राज्य स्पर्धा करत होती. आज दहा राज्यात स्पर्धा करत आहेत. आपण त्याकरता देखील आनंदित राहिलं पाहिजे, देशाचा विकास करायचा असेल तर सर्व राज्यानी पुढे गेलं पाहिजे. केवळ महाराष्ट्राने देशाचा विकास होत नाही. सर्व राज्यांनी विकास केला पाहिजे, तर त्याचवेळी सर्व राज्यांना मागे टाकून महाराष्ट्र कसा पुढे राहील हा प्रयत्न आम्हाला करायचा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपल्या राज्यात आली आहे. आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना चालतात. सामूहिक प्रोत्साहन योजना याच्या अंतर्गत ही आकडेवारी एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतरची देत आहे, 2022 पासून आतापर्यंत 221 मोठे, विशाल, अति विशाल असे प्रकल्प आले आहेत. त्यामध्ये तीन लाख 48 हजार 70 इतकी गुंतवणूक आहे. दोन लाख तेरा हजार 267 इतका रोजगार त्यातून निर्माण होणार आहे. तर आपल्या अर्थव्यवस्थेला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायची आहे, ज्या सेक्टरमध्ये गुंतवणूक आली तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढे जाईल, असंही फडणवीसांनी पुढे म्हटलं आहे.
आपण तसं धोरण हे 22-02-2024 ला जाहीर केलं ते जाहीर केल्यापासून ते जाहीर केल्यापासून 10 मोठ्या प्रकल्पांना आपण मंजुरी दिली. त्याच्यातली गुंतवणूक आहे दोन लाख 39 हजार 117 कोटी रुपये आणि 79 हजार 720 एवढी त्याच्यामध्ये निर्मिती होणाऱ्या रोजगाराची आपण जर बघितलं तर या काळामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये या ठिकाणी गुंतवणूक येते आहे. उदाहरणार्थ विचार केला तर 47 प्रकल्प मोठे प्रकल्प या ठिकाणी आले आहेत यामध्ये एक लाख 23 हजार 931 एवढी गुंतवणूक आहे, 61 हजाराचा रोजगार आहे. मराठवाड्यामध्ये 38 प्रकल्प या ठिकाणी आलेले आहेत 74,646 कोटी रुपयांचे गुंतवणूक आहे. 41 हजार 325 एवढा रोजगार आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 136 प्रकल्प आलेले आहेत त्यामध्ये एक लाख 49 हजार 493 कोटीची गुंतवणूक आहे, एक लाख दहा हजार 588 आणि मला पुन्हा सांगताना आनंद वाटतो परकीय गुंतवणुकीत आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
2015 ते 2019 महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता, नंतर दोन वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये एक वर्ष कर्नाटक नंबर वन वर गेला त्यानंतर गुजरात नंबर वन वर गेला, पुन्हा आपलं सरकार आलं. पुन्हा महाराष्ट्रच नंबर वन वर आणि देशाची 31 टक्के गुंतवणूक आपल्याकडे आहे. पण आपण जर विचार केला तर पहिल्या कॉटरमध्ये देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. मागच्या वर्षी आपण नंबर वन होतो. मागच्या वर्षी जेवढे गुंतवणूक आली होती, त्याची 90% गुंतवणूक ही पहिल्या दोन कॉटरमध्ये झाली, माझी आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही विनंती आहे आणि आमच्यावर टीका जरूर करा की तुम्ही केलीच पाहिजे तुमचा अधिकारी यांनी आहे आणि तुमचा आमच्यावर अंकुश आहे, असंही यावेळी फडणवीस म्हणालेत.
गुजरात पुढे गेला आहे, आपण देखील पुढे गेलं पाहिजे. तुम्ही असं म्हणा, आज आपण पाहू शकतो टोयोटा हे कर्नाटक सोडून आपल्याकडे आलं. कर्नाटकात त्यांची फॅक्टरी आहे. हा नविन प्रकल्प आहे. मला आनंद आहे की, मुंबई आणि पुणे सोडून जात नव्हतं प्रकल्प जात नव्हते. आता संभाजीनगर आणि जालना याठिकाणी नवे प्रकल्प येत आहेत. येत्या काही काळात गडचिरोलीमध्ये मोठी गुंतवणूक होईल. आता सर्व ठिकाणी गुंतवणूक होत आहे. आता महाराष्ट्रातील स्प्रेड एका ठिकाणी राहिलेला नाहीये. महाराष्ट्रामध्ये सर्व भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. सर्वच राजकीय नेत्यांना विनंती आहे, जर गुंतवणुकदारांना त्रास देणे, खंडणी वसूलकरणे, असे प्रकार झाले तर गुंतवणूक येणार नाही, माझ्यासह सर्व पक्षांना विनंती आहे, वसूली करणारे कोणाचा ना कोणाचा आसरा घेतात, आणि हे खपवून घेतलं जाणार नाही, त्यावर कठोरातलीकठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा फडणवीस दिला आहे.