एक्स्प्लोर

Sanjay Raut: सौ सोनार की एक लोहार की, 72 तासात हे सरकार जाणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत आक्रमक

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar) झाप झाप झापल्यानंतर आता ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकरांनी वेळकाढूपणा केल्याचा अप्रत्यक्ष ठपका सुप्रीम कोर्टाने ठेवला.

नाशिक : "72 तासात हे सरकार जाणार. 72 तास मी आधीही बोललो होतो आता वेळ आलीय", असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar) झाप झाप झापल्यानंतर आता ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकरांनी वेळकाढूपणा केल्याचा अप्रत्यक्ष ठपका सुप्रीम कोर्टाने ठेवला. शिवाय पोरखेळ लावलाय का अशा कडक शब्दात कोर्टाने नार्वेकरांना सुनावलं.  

विधानसभा अध्यक्षांनी ICU मध्ये टाकून सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांनाच ICU मध्ये जाण्याची वेळ आली आहे. सौ सोनार की एक लोहार की असं आजचं न्यायालयाचे मत आहे. हातोडा मारला आहे, असं संजय राऊत म्हणाले. 

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? 

- विधानसभेचे अध्यक्ष हे खडे बोल सुनावण्याच्या योग्यतेचे आहेत
- ज्या गांभीर्याने संविधान घ्यायला पाहिजे त्या गांभीर्याने घेत नाही
- तुम्ही सर्वोच न्यायालय काय नौटंकी समजलात का
- सो सोनार की एक लोहार की
- विधानसभा अध्यक्ष यांनी आणि त्यांच्या पालकांनी शहाणपण घेतला तर बरं आहे
- अन्यथा हे लोक न्यायव्यवस्था कशी पायदळी तुडवतात हे उघड होईल
- आम्हाला आदेश द्यावा लागेल असे न्यायालयाने संगीतल आहे
- हे दहा पक्ष फिरून बारा गावचं पाणी पिलेले लोक आहेत
- यांना पक्षांतर, घटना बाह्य सरकार याच्याशी घेणं नाही
- यांना दिल्लीच्या आदेशाने सरकार वाचवायचं आहे
- घटना पदावर बसलेल्या व्यक्तीने नीतिमत्ता आणि मर्यादा ठेवली पाहिजे
- विधानसभा अध्यक्षांना आवाहन, बाबासाहेबांचे संविधान हल्ल्यात घेऊ नका
- सरकार जाण्याची वेळ आता आली आहे
- जितका वेळ icu मध्ये ठेऊन वाचवायचे होते ते अध्यक्ष यांनी वाचवले आहे
- आता विधानसभा अध्यक्षांना icu मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे
- कायदा एकच आहे त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना ला हा निर्णय लागू होईल
- हा एक चपराक आहे, न्यायालयाने हातोडा विधानसभा अध्यक्ष यांच्या टाळक्यात मारला आहे
- सरकार 72 तासात जाणार 
- दिल्लीत जाऊन आदेश घेऊन येतात,योग्य वेळी योग्य निर्णय त्यांनी आम्हाला सांगू नये
- तुमचा निर्णय आम्ही करु,2024 पर्यंत पण थांबण्याची गरज नाही

अरविंद सावतांचा हल्लाबोल

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला. सुप्रीम कोर्टाने आज राहुल नार्वेकरांची कानशिलात सुजवली आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी घणाघात केला. 

सुप्रीम कोर्टाने केवळ नाराजी व्यक्त केली नाही तर कानशिलात सुजवली. गाल लाल केले. कोर्टाने सणसणीत लगावली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवायची ठरवलं होतं, त्यामुळे कोर्टाने श्रीमुखात भडकावली. शुद्धीवर या असं सांगितलं. इतकं चिडलेलं सुप्रीम कोर्ट गेल्या दहा वर्षात कुणी पाहिलं नसेल. विधानसभा अध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे गुलाम आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर चालतात. इतके महिने तुम्ही केले काय? असा प्रश्न कोर्टाने विचारला, यात आणखी काय पाहिजे? निवडणुका येतीलच आता महाराष्ट्रातील जनतेने अशांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, असं अरविंद सावंत म्हणाले. 

सुप्रीम कोर्टात काय झालं? 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या याचिकेवर एकत्र सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे आणि पवार गटाचा आहे. त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब सुप्रीम कोर्टाने केलं. राहुल नार्वेकरांनी नवं वेळापत्रक करावं, पोरखेळपणा करु नये अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने सुनावलं. तसेच, विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे  पोरखेळ करताय का? असं म्हणत सरन्यायाधीशांनी अत्यंत कडक शब्दांत राहुल नार्वेकरांना सुनावलं.  

अध्यक्षांचं वेळापत्रक आम्हाला अजिबात मान्य नाही, असं म्हणत सरन्यायाधीश विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रचंड नाराज झाले होते. फक्त वेळकाढूपणाचं धोरण अध्यक्ष राबवत असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. तर राहुल नार्वेकरांना स्पष्ट शब्दांत आदेश देण्यात आले आहेत की, मंगळवारी (17 ऑक्टोबर) विधानसभा अध्यक्षांनी नवं वेळापत्रक सादर करावं.  

VIDEO : संजय राऊत यांचा हल्लाबोल

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: पोरखेळ करताय का? सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना झाप झाप झापलं! 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Embed widget