एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet expansion: मोठी बातमी! नवाब मलिकांची लेक मंत्री होणार, नरहरी झिरवळांनाही लॉटरी; अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

Maharashtra Cabinet Expansion: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्याची संभाव्य यादी समोर आली आहे.

Maharashtra Cabinet Expansion मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात दुपारी होणार आहे. 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी होईल. उद्या (15 डिसेंबर) भाजपचे 21, शिवसेनेचे 12 राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजता शपथविधी होईल, अशी माहिती समोर येत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्याची संभाव्य यादी (NCP Ajit Pawar Cabinet Minister List) एबीपी माझ्याच्या हाती आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्या वाट्याला आलेल्या 10 च्या 10 मंत्र्यांच्या जागा भरणार आहे. अजित पवारांनी शपथ घेतली असल्यानं उरलेले नऊ आमदार उद्या मंत्रिपदाचीशपथ घेतील असा अंदाज आहे.  संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती लागली असून यामध्ये माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा समावेश नाहीय.

नवाब मलिकांची लेक मंत्री होणार, नरहरी झिरवळांनाही लॉटरी-

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रथमच नरहरी झिरवळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात सना मलिक आणि इंद्रनील नाईकांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सना मलिक आणि इंद्रनील नाईक यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

1. छगन भुजबळ
2. आदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. संजय बनसोडे
5. अजित पवार
6. मकरंद पाटील
7. नरहरी झिरवाळ
8. धनंजय मुंडे 

राज्यमंत्री- 

1. सना मलिक
2. इंद्रनील नाईक

1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार-

शपथविधी सोहळ्याची राजभवनात तयारीला सुरुवात झाली आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनच्या हिरवळीवर रविवारी दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.

आमदारांच्या निवासस्थानी जंतूनाशक फवारणी-

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या निवासस्थानी पालिकेकडून जंतूनाशक फवारणी, 16 तारखेपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. नागपूरमध्ये चिकनगुनिया व डेंग्यूचा प्रकाप नागपूर मध्ये चांगलाच पाहायला मिळाला होता. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांचे थांबण्याचे ठिकाण असलेल्या आमदार निवास, रविभवन, विधानभवन परिसरात नागपूर महानगर पालिकेकडून जोरदार फवारणी मोहीम सुरू आहे. कुठे पाणी तर साचले नाही, डेंग्यूचा लारवा तर नाही याचा कसून शोध घेतला जात आहे.

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Cabinet expansion: प्रतिक्षा संपली! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली समोर, उद्या शपथविधी होणार

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Bangladesh New PM:  तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान, 25 जणांच्या मंत्रीमंडळात एका हिंदू चेहऱ्याला संधी
Bangladesh New PM :  तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान, 25 जणांच्या मंत्रीमंडळात एका हिंदू चेहऱ्याला संधी
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र
इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र...
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
Embed widget