Maharashtra Breaking News: माणिकराव कोकाटेंची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी
Maharashtra Breaking News: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
LIVE

Background
Maharashtra Breaking News: विधिमंडळात रमी खेळल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलीय आहे. माणिकराव कोकाटेंकडून कृषिखात्याचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांना भरणेंकडे असलेल्या क्रीडा, युवा कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास खात्याचा पदभार देण्यात आलाय, तर दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषिमंत्री असणार आहेत. तसेच अमेरिकेचा भारतावर टॅरिफबॉम्ब तर पाकिस्तानशी तेलकरार केला आहे. एके दिवशी पाकिस्तान भारताला तेल विकेल, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं. तर देशसाठी सर्व पावलं उचलू भारताची भूमिका आहे. या बातम्यांसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
महिला शेत मजुरांचं वाहन झाडावर अडळलं; 21 महिला मजूर जखमी
भात पिकाची लागवड कामासाठी घेवून जाणाऱ्या महिला मजुरांचं भरधाव वाहन झाडावर आदळलं. या भीषण अपघातात वाहनात बसलेल्या २१ महिला मजूर जखमी झाल्यात. ही घटना भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील मासलमेटा गावाजवळ घडली. सर्व जखमींवर लाखणी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
राज्यातील गोविंदांसाठी आनंदाची बातमी! गोकुळाष्टमीनिमित्त राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण
राज्यातील गोविंदांसाठी आनंदाची बातमी
गोकुळाष्टमीनिमित्त राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण
तब्बल एक कोटी बारा लाख 50 हजार इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम करण्यात आला
गोविंदांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि पूर्वेस सरनाईक यांनी केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी























