Udayanraje Bhosale : देवेंद्रजी एवढं काम करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात, त्यांच्या पाठिशी उभं राहायला पाहिजे : उदयनराजे भोसले
Udayanraje Bhosale, सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
Udayanraje Bhosale, सातारा : "देवेंद्रजी एवढं काम करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. आपण त्यांच्या पाठिशी उभं नाही, राहायचं तर कोणाच्या पाठिशी उभं राहायचं?" असं आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. कराड-उत्तरचे भाजप उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ पाल, कराड येथे जाहीर सभेची आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
हे लोक फक्त नाकार्तेपणा लपवण्यासाठी चिखल फेक करतात
उदयराजे भोसले म्हणाले, महायुतीची प्रगती सुरु आहे. चांगल्या योजना राबवल्या आहेत. जो काम करतो त्याला ठेस लागते. हे लोक फक्त नाकार्तेपणा लपवण्यासाठी चिखल फेक करतात, व्यक्ती दोषावर बोलतात. देवेंद्र फडणवीस एवढं काम करत असताना त्यांना धमक्या मिळतात. जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण यांच्या पाठीशी उभे रहायचे नाही तर कोणाच्या समोर उभे रहायचे? असा सवालही उदयनराजे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण नुसतं विकास करुन थांबलो नाही, तर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आता सरकारने शेतकऱ्यांचे बिल भरणयाचा निर्णय घेतला. आता शून्य बिल येते. सौर उर्जाही सुरु केली आहे. चोविस तास वीज देणार आहोत. रात्री शेतकऱ्यांना जायची गरज लागणार नाही. शेतकऱ्यांचा टॅक्स माफ केला. अमित शाह यांनी 10 हजार कोटी रुपयांचा इनकमटॅक्स रद्द केला. सरकार आले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता 1500 नाही तर 2100 देणार - देवेंद्र फडणवीस
आमच्या बहिणी आता बाहेर पडल्या आहेत. सर्व शिक्षणाची फी राज्य सरकार भरत आहे. मुलीचे मामा मंत्रालयात बसलेत. मुलींच शिक्षण मोफत केले. लाडकी बहीण योजना सुरु केली. 1500 द्यायला सुरवात केली. नौटंकी बाज बोलायला लागले योजना बंद होईल. आम्ही लाडके भाऊ आहोत तसे ते सावत्र भाऊ आहेत, ते कोर्टात गेले. काळजी करु नका तुमचे सख्खे भाऊ बसलेत. ही योजना भविष्यातही सुरुच राहणार आहेत. आता 1500 नाही तर 2100 देणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी कालच सांगितले आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Navneet Rana : नणंद बाईकडे खूप माल आहे, कडक नोटा आहेत; नवनीत राणांचा यशोमती ठाकूर यांच्यावर हल्ला