Uddhav Thackeray : शिवाजी महाराज म्हटलं की यांच्या अंगाची लाही लाही होते, देवा भाऊ जाऊ तिथे खाऊ : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : मुलींबरोबर राज्यातील मुलांनाही आम्ही मोफत शिक्षण देणार आहोत. पाच जीवनावश्यक वस्तू आहेत त्यात शेतकऱ्यांचं नुकसान न करता स्थिर ठेवणार आहे, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
Uddhav Thackeray, मुंबई : "मुलींबरोबर राज्यातील मुलांनाही आम्ही मोफत शिक्षण देणार आहोत. पाच जीवनावश्यक वस्तू आहेत त्यात शेतकऱ्यांचं नुकसान न करता स्थिर ठेवणार आहे. विरोधक उद्या श्वास घ्यायला ही हे टॅक्स लावतील. आपण जे करतो ते आपण खुलेआम करतो. आम्ही शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयांचं कर्ज माफ करुन दाखवणार आहे", असं ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईतील महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी प्रत्येक जिल्हात शिवाजी महाराज यांचं मंदिर बांधणार आणि सुरतेलाही बांधणार आहे. शिवाजी महाराज म्हटलं की यांच्या अंगाची लाही लाही होते. देवा भाऊ आणि जऊ तिकडे खावू. मुंब्र्यात त्यांनी मंदीर बांधायला चॅलेंज केलं. मात्र ते विसरले की मुंब्र्याच्या वेशीवर शिवाजी महाराज, तुकाराम यांची वेस आहे. ज्या गद्दाराला तुम्ही फोडला आणि मुख्यमंत्री म्हणून डोक्यावर बसवला. त्याच्या ठाण्यात तुम्हाला मंदिर बांधता येत नाही, असं वाटत असेल तर कशाला डोक्यावर बसवला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केला.
पुढे बोलतान उद्धव ठाकरे म्हणाले, कोळीवाडयाचा विकास आम्ही करणार आहोत. हे इमारत बांधून देतील मग त्यांच्या होड्या काय पार्किंगमध्ये लावणार का आणि गच्चीत मासे सुकवणार का? आता निवडकांचे फटाके वाजायला लागले आहेत. आपल्याकडे आयटम बॉम्ब आणि पलिकडे फुसके आणि लवंगी आहेत. 23 तारखेला फटाके वाजवण्याचा निश्चय करायला आज आपण आलो आहोत. फराळ करायला जमत नाही असं काही जण म्हटले कारण महागाई वाढली आहे.
संविधान बचाव हा जर भाजपला फेक नॅरेटीव्ह वाटत असेल तर मग धारावीची जागा देण्याच्या संदर्भात काढलेले निर्णयाच काय? आमचं सरकार आल्यानंतर आम्ही उद्योगपतींसंदर्भात घेतलेले रद्द करणार आहोत. सर्व त्यांना टीडीआर द्यायचा आणि जागा ही द्यायची. कोरोना काळात आम्ही धारावी वाचवली होती आता पुन्हा एकदा धारावी आम्ही वाचवणार आहोत. कोळीवाडेही आम्ही वाचवणार आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
जे पक्ष सोडून जात आहेत त्यांच्याकडून मुंबईच कधीच भल होणार नाही. या मुंबईमध्ये देशभरातील सर्व नागरिक येथे येऊन काम करतात आणि पोट भरतात. तुम्ही सर्व जण एकत्र उभे राहीला तर तुमचे उद्योग व्यवसाय कुठे घेऊन जाणार नाही, असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या