एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election : भाजपने काही ठिकाणी भाकरी फिरवली पण घरातल्या घरात, आशिष शेलारांच्या भावाला तिकीट, गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतलीये, मात्र काही ठिकाणी घरातल्या घरातच भाकरी फिरवण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. निवडणूक समितीच्या बैठकीनंतर भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने 10 मतदारसंघात भाकरी फिरवली आहे. मात्र, संबंधितांच्या घरातील व्यक्तींनाच पुन्हा एकदा मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी भाजपने आमदार आशिष शेलार यांनाही उमेदवारी दिली आणि त्यांचे बंधू असलेल्या विनोद शेलार यांनाही मैदानात उतरवलं आहे. दुसरीकडे कल्याणमध्ये पोलीस ठाण्यात फायरिंग करणाऱ्या गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड तिकीट देण्यात आलं आहे. 

काही ठिकाणी घरातल्या घरात भाकरी फिरवली 

प्रतिभा पाचपुते - श्रीगोंदा 

विनोद शेलार - मालाड पश्चिम 

राजेश बकाने - देवळी (गेल्यावेळी अपक्ष) 

श्रीजया चव्हाण - भोकर 

शंकर जगताप - चिंचवड 

विनोद अग्रवाल ( गेल्यावेळी अपक्ष) - गोंदिया 

अनुराधा चव्हाण - फुलंबरी

सुलभा गायकवाड ( आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी) - कल्याण पूर्व 

राहुल आवाडे - इचलकरंजी 

अमोल जावळे (हरिभाऊ जावळे यांचे पुत्र)- रावेर

पहिली उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पार्टीने मला विधानसभा निवडणुकीसाठी सहाव्यांदा संधी दिली. भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह आणि मा. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच केंद्रीय निवडणूक समितीतील सर्व सन्माननीय नेत्यांचा मी नितांत आभारी आहे. पक्षनेतृत्त्व, माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील नागरिक आणि माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेने सातत्याने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचाच माझा प्रयत्न असेल. भाजपाच्या पहिल्या यादीत माझ्याव्यतिरिक्त आणखी 98 उमेदवार जाहीर झाले आहेत, त्यात आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह या उमेदवार यादीतील सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा!

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या दोन्ही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी 

चंद्रपूर जिल्ह्यातल्या एकूण 6 मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी भाजप आमदार होते आणि या दोन्ही आमदारांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. चिमूर मतदार संघातून वर्तमान आमदार बंटी भांगडीया आणि बल्लारपूर मतदारसंघातून वर्तमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. उर्वरित चार मतदारसंघात अद्याप नावांची निश्चिती झालेली नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha election : मोठी बातमी : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, पहिल्या यादीत 99 नावं, फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 13 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaPriyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषणABP Majha Headlines : 03 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Embed widget