एक्स्प्लोर

Vidhan Sabha Elections 2024: मोठी बातमी: भाजपच्या निलेश राणेंचं स्वप्न भंगणार, गुहागर विधानसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंच्या मेहुण्याला उमेदवारी?

maharashtra assembly election 2024: गुहागर विधानसभा मतदारसंघात नवा चेहरा रिंगणात उतरणार, शिंदे गटाचा उमेदवार ठरला. श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता.

रत्नागिरी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही सगळी चर्चा सुरु असताना भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी विधानसभा निवडणुकीच्या  रिंगणात उतरण्याचा मानस व्यक्त केला होता. निलेश राणे हे कुडाळ किंवा गुहागर विधानसभा मतदारसंघातून (guhagar vidhan sabha) निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यात निलेश राणे यांचे गुहागरमधील दौरे वाढले होते. त्यांची गुहागरमधील सभाही प्रचंड गाजली होती. तेव्हापासूनच निलेश राणे हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांचा विजय झाला होता. त्यामुळे ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरुन श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्या मेहुण्याला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम (Vipul Kadam) हे यंदा गुहागरमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असू शकतात. विपुल कदम हे खेडमधील तळे गावचे रहिवासी आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गुहागरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. पितृपक्ष संपल्यानंतर शिंदे गटाकडून विपुल कदम यांच्या नावाची घोषणा होईल, असे सांगितले जाते. तसे घडल्यास निलेश राणे यांचे गुहागरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगणार आहे. त्यामुळे राणे कुटुंबीय आणि भाजप पक्षाकडून विपुल कदम यांच्या उमेदवारीबाबत काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल. 

गुहागरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा राजकीय सामना रंगणार ?

खासदार श्रीकांत शिंदे यांचा मेहुणा विपुल कदम यांची  गुहागरमधून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची माहिती ABP माझाला सूत्रांकडून मिळाली आहे. विपुल कदम रिंगणात उतल्यास गुहागरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगेल. याठिकाणी ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. 

मात्र, त्याचवेळी भाजपकडून माजी आमदार विनय नातू हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे या जागेवरुन भाजप आणि शिंदे गटात पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता गुहागरची जागा आपल्या मेहुण्यासाठी पदरात पाडून घेताना श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे हे भाजपची समजूत कशाप्रकारे काढणार, हे आगामी काळात पाहावे लागेल.

आणखी वाचा

उद्धव ठाकरे घाबरले, सोनिया गांधींनी सांगितलं फोटो टाकायचा नाही, श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Embed widget