उद्धव ठाकरे घाबरले, सोनिया गांधींनी सांगितलं फोटो टाकायचा नाही, श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला
सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतलेला फोटो टाकायला उद्धव ठाकरे घाबरले असतील.त्यांच्यासोबत फोटो आला तर टीका होईल. सोनिया गांधींनी सांगितलं असेल की फोटो टाकायचा नाही असा टोला त्यांनी लगावला.
![उद्धव ठाकरे घाबरले, सोनिया गांधींनी सांगितलं फोटो टाकायचा नाही, श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला Shivsena MP Shrikant Shinde Criticism on Uddhav Thackeray Maharashtra politicis news उद्धव ठाकरे घाबरले, सोनिया गांधींनी सांगितलं फोटो टाकायचा नाही, श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/09/9239243c05d0edbbd6db7572ccce94e61723186253408339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shrikant Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी जोरदार टीका केलीय. आधी सगळे लोक मातोश्रीवर येत होते. पण आज उद्धव ठाकरेंना दिल्लीत येऊन तीन-तीन दिवस बसाव लागतंय. महाराष्ट्रानं असं चित्र कधी पाहिलं नव्हतं असे श्रीकांत शिंदे म्हणाले. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतलेला फोटो टाकायला उद्धव ठाकरे घाबरले असतील. कारण, त्यांच्यासोबत फोटो आला तर टीका होईल. सोनिया गांधींनी सांगितलं असेल की फोटो टाकायचा नाही असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
वक्फ बोर्ड विधेयकाच्या वेळी ठाकरे गटानं सभागृहाबाहेर पळ काढला
उद्धव ठाकरे अनेक लोकांना फोन करुन भेटायला या म्हणून विनंती करत होते. काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला याबाबत सांगिल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. आयडिऑलॉजिकल संभ्रम ठाकरेंच्या खासदारांमध्ये असल्याचे शिंदे म्हणाले. काल वक्फ बोर्ड विधेयकाच्या वेळी त्यांनी सभागृहाबाहेर पळ काढल्याचे शिंदे म्हणाले. उबाठाच्या नेत्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही भूमिका का स्पष्ट केली नाही. मुस्लीम समाजाला कसा न्याय मिळालं त्यासाठी हे बिल आणलं आहे असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना बघितले त्यावेळी मला दु:ख झालं, देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)