एक्स्प्लोर

मोठी बातमी! अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे थेट शरद पवारांच्या भेटीला; राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी

राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) वारे वाहू लागले आहेत. राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच कारणामुळे राज्याच्या राजकीय पटलावरदेखील मोठ्या घडामोडी घडत आहेत. जवळजवळ सर्वच पक्षांतील आजी-माजी आमदारांची तिकीट मिळवण्यासाठी धडपड चालू आहे. नेतेमंडळी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेत आहेत. असे असतानाच आता सोलापूरच्या राजकारणात मोठ्या हालचाली होत आहे. माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे (Baban Shinde) हे राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला पोहोचले आहेत. विशेष म्हणजे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हेदेखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी बबन शिंदे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. शिंदे यांच्या या भेटसत्रामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

बडे नेते शरद पवारांच्या भेटीला 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार समर्थक असलेले माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे दाखल झाले आहेत. भोसरीतील माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. बबनदादा शिंदे आणि विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र, शरद पवारांच्या भेटीला आल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. कालच राजन पाटील यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतली होती. 

लोकसभेच्या निकालामुळे नेत्यांचा कल बदलला? 

अजित पवारांसोबत असणारे आमदार, माजी आमदार आणि लोकप्रतिनिधी शरद पवारांच्या भेटीला येत आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या भेटीला येत आहेत. त्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचं लोकसभेतील स्ट्राईक रेट असण्याची शक्यता आहे.  पक्ष सोडून गेलेल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात शरद पवार अनेक युवकांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

शरद पवारांना भेटण्यासाठी आलेले पदाधिकारी

माढा -अजित पवार गटाचे आमदार व नगरसेवक, आमदार बबन शिंदे माढा विधानसभा मतदारसंघ 

भोसरी - भोसरीचे माजी आमदार विलास लांडे चार नगरसेवकांसह पुन्हा शरद पवारांच्या भेटीला. त्यांनी मागील आठवड्यातदेखील शरद पवारांची भेट घेतली होती. प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, विनोद नडे आदी नगरसेवक विलास लांडे यांच्यासोबत आले आहेत.

आष्टी - पाटोदा - आष्टी पाटोदा येथील शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख राम खाडे हे अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्याविरोधात रिंगणात उतरणार असल्याने तेदेखील शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदीबागेत दाखल झाले आहेत.

अकोले : अकोले विधानसभेसाठी इच्छुक असणारे अमित भांगरे आईसह शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. अमित भांगरे अकोला विधानसभेतून आमदार किरण लहामटे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत, तेदेखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.

हेही वाचा :

Girish Mahajan : अगोदर बावनकुळे आता गिरीश महाजन, वित्त विभागाच्या विरोधानंतरही महाजनांशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा निधी, मंत्रिमंडळाचा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget