एक्स्प्लोर

मुकेश अंबानी एका दिवसात किती रुपये कमवतात? त्यांच्यासारखं श्रीमंत व्हायचं म्हटल्यावर लागतील पावणे दोन कोटी वर्षे!

उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. ते अब्जाधीश आहेत. ते एका दिवसात किती रुपये कमवत असतील, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Reliance Industries: रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे अब्जाधीश आहत. ते फक्त भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची त्यांची एकूण संपत्ती 116 अब्ज डॉलर्स आहे. ब्लुमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार ते जगातील 12 व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांच्यानंतर ब्लुमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या यादीत उद्योगपती गौतम अदाणी (Gautam Adani) यांच्या क्रमांक येतो. त्यांची एकूण संपत्ती ही 104 अब्ज डॉलर्स आहे. अनिल अंबानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. पण ते प्रत्येक दिवशी किती पैसे कमवतात हे फारच कमी लोकांना माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर मुकेश अंबानी एका दिवसात किती रुपये कमवतात तसेच त्यांच्याएवढं श्रीमंत होण्यासाठी सामान्य माणसाला किती वर्षे लागतील? हे जाणून घेऊ.

मुकेश अंबानी एका दिवसात 'इतके' कोटी कमवतात 

मुकेश अंबानी हे अब्जाधीश आहे. एका दिवसात ते कोट्यवधी रुपये कमवतात. भारतातील एखादी सामान्य व्यक्ती वर्षाला चार लाख रुपये कमवत असेल तर मुकेश अंबानी यांच्याएवढी संपत्ती कमवण्यासाठी त्या व्यक्तीला तब्बल 1.74 कोटी वर्षे लागतील. मुकेश अंबानी दरवर्षी 15 कोटी रुपये पगार घ्यायचे, असे म्हटले जाते. मात्र करोना महासाथीनंतर त्यांनी आपला पगार घेतलेला नाही. ते पगार घेत नसले तरीही ते दररोज 163 कोटी रुपये कमवतात. रिलायन्स उद्योग समुहात असलेल्या मालकीतून (शेअर होल्डिंग) मुकेश अंबानी यांना हे पैसे मिळतात. मुकेश अंबानी यांचा रिलायन्स उद्योग समूह हा पेट्रोकेमिकल, ऑइल, टेलीकॉम, रिटेल तसेच इतरही अनेक क्षेत्रांत विस्तारलेला आहे. मुकेश अंबानी यांचे मुंबईत अँटेलिया नावाचे आलिशान घर आहे. या घराची किंमत तब्बल 15 हजार कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.यासह मुकेश अंबानी यांनी इतरही ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. 

कधीकाळी प्रत्येक तासाला कमवायचे 90 कोटी रुपये 

रिलायन्स उद्योग समुहाची जगभरात एक वेगळी ओळख आहे. 2020 साली मुकेश अंबानी प्रत्येक तासाला 90 कोटी रुपये कमवायचे. याच वर्षी मुकेश अंबानी यांचा धकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani)  यांचे राधीका मर्चंट यांच्याशी लग्न झाले. या लग्न सोहळ्यातच अंबानी कुटंबाने तब्बल 5000 कोटी रुपये खर्च केले होते. या लग्नसोहळ्याच्या अगोदर आयोजित करण्यात आलेला प्री वेडिंग सोहळा तसेच पोस्ट वेडिंग सोहळ्याचीही जगभरात चर्चा झाली होती. 

हेही वाचा :

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळण्यास सुरुवात, पाहा तिसरा हप्ता आला की नाही? 'ही' अट अजूनही कायम!

म्युच्यूअल फंडात मिळतात भरपूर रिटर्न्स, पण नेमकं कोणत्या फंडात गुंतवणूक करावी? जाणून घ्या....

....तर तुमचं लाखोंचं कर्ज होईल माफ, कुटुंबाला एक रुपयाही भरायची गरज नाही; जाणून घ्या लोन इन्शुरन्स म्हणजे काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok - Sreejaya Chavan Majha Katta : कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; चव्हाण बाप-लेक 'माझा कट्टा'वरGondia Mobile Bomb :  तुमच्या खिशात बॉम्ब? मोबाईल वापरण्यांनी ही बातमी पाहाचParag Shah Wheelchair : व्हिलचेअरवर बसून पराग शाह विधानभवनात दाखलSpecial Report Beed Fake Medicine : विषारी डोस! सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Embed widget