एक्स्प्लोर

ठाकरे गट 20 ते 22 जागांसाठी आग्रही, शरद पवार गट सात जागांसाठी उत्सुक; मविआ मुंबईतील तिढा कसा सोडवणार?

मविआच्या पुढील बैठकीतही मुंबईतल्या जागांसंदर्भात चर्चा होत राहणार आहे शिवसेना ठाकरे गट अजूनही 20  ते 22 जागांवर आग्रही आहे.

 मुंबई :  महाविकासआघाडीच्या (Maha Vikas Aghadi)  गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.  मुंबईतील जागावाटपाचं महाविकास आघाडीचं भिजत घोंगडं कायम आहे. 2019 ला जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त इतर 16 जागांवर अजूनही चर्चा सुरूच आहे. काही जागांवर तीनही पक्ष तर काही जागांवर दोन पक्षांचा दावा कायम आहे. त्यामुळे मविआच्या पुढील बैठकीतही मुंबईतल्या जागांसंदर्भात चर्चा होत राहणार आहे शिवसेना ठाकरे गट अजूनही 20  ते 22 जागांवर आग्रही आहे. तर त्यातील काही जागांवर काँग्रेसही आग्रही आहे. राष्ट्रवादीने मुंबईतल्या 5 ते 7 जागांवर आपला दावा सांगितलाय.  

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात (Seat Sharing) मुंबईत महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभेसाठी जागा वाटपाच्या रणनितीवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. मुंबईतील वादाती जागांचा निर्णय काँग्रेस हायकमांड सोडवणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस नेत्यांकडून मविआतील घटक पक्षाकडे भूमिका स्पष्ट झाली आहे.  जागेबाबतचा हायकमांडचा निर्णय मान्य असेल अशी भूमीका काँग्रेस नेत्यांनी  केली आहे. मुंबईत काँग्रेस-ठाकरे गटात जागांवरुन मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी  दिली आहे. आगामी बैठकांमध्ये जागावाटपाचा निर्णय होईल असा  मविआतील नेत्यांना विश्वास आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत हव्यात सात जागा 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत सात जागा  हव्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने  काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सात जागांसाठी  प्रस्ताव दिल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे.  विशेष म्हणजे मुंबईतील घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्ती नगर, मलबार हिल या जागांवर राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील विधानसभेच्या जागांचा प्रस्ताव सादर  केला आहे.  

कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?  

मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात एकूण विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्यापैकी, 7  जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली आहे. त्यामुळे, उर्वरीत जागा ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसला सोडल्या जातील. त्यामुळे, नेमकं किती व कोणत्या जागा कोणत्या पक्षाला मिळतील, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.   लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात झालेला उशीर महायुतीसाठी डोकेदुखी ठरल्याने आता विधानसभेसाठी लवकरच जागावाटप करण्याची योजना महायुतीच्या सर्वच पक्षांकडून आखली जात आहे.

हे ही वाचा :

Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Ajit Pawar FaceBook Hack : अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक?  शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक? शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...
दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...
Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 03 PM : 19 September 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBacchu Kadu and Raju Shetti : तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एन्ट्री : बच्चू कडूPrakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Ajit Pawar FaceBook Hack : अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक?  शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक? शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...
दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...
Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Amit Thackeray: मोठी बातमी: अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार?
अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार?
Embed widget