एक्स्प्लोर

माढ्यात शिंदे विरुद्ध साठे असा सामना होणार? मिनल साठेंनी घेतली जयंत पाटलांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसच्या नेत्या आणि माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे (Minal Sathe) यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतलीय.

Madha Vidhansabha Election : लोकसभा निवडणुकीची (Madha Vidhansabha Election) रणधुमाळी संपली आहे. आता पुढच्या काही महिन्यांमध्येच राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) संग्राम सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत राज्यात चर्चेचा विषय ठरणारा माढा लोकसभा मतदारसंघ विधानसभेच्या निवडणुकीत देखील चर्चेत राहण्याची शक्यता आहे. कारण या विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुन माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे (Minal Sathe) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेतलीय. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या माढ्यात बबनदादा शिंदे (Babandada shinde) हे विद्यमान आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे (Ranjitsingh shinde) हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळं माढ्यात रणजितसिंह शिंदे विरुद्ध मिनल साठे असा सामना होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. मिनल साठे यांनी सांगलीत जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. पण ही भेट सदिच्छ भेट होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिनल साठे यांनी दिली. मात्र, या भेटीमागे विविध राजकीय तर्क काढले जात आहेत. माढ्यातील साठे कुटुंब हे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेलं कुटुंब मानलं जाते. मध्यंतरी काही काळ साखर कारखाना अडचणीत असल्यामुळं साठे कुटुंबाने भापमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पुन्हा त्यांनी घरवापसी केली आहे. 

माढ्यात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना होणार?

सध्या माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिदे हेदेखील दररोज तालुक्यातील विविध गावांना गाठी भेटी देत आहेत. लहान मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. तसेच मिनल साठे देखील गावोगावचे दौरे करत आहेत. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तिकीट सुटण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तिकीट सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळं शिंदे विरुद्ध कोण? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. कारण माढा तालुक्यात साठे यांच्याशिवायत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधु शिवाजीराव सावंत यांचे देखील अस्तित्व आहे. त्यांचे साखर कारखाने, बँका, शिक्षणसंस्था आहेत. ते सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. त्यामुळं ते कोणती भूमिका घेणार याकडं देखील सर्वाचं लक्ष आहे. तसेच शरद पवार गटात संजय पाटील घाटणेकर, संजय कोकोटे ह देखील सक्रिय आहे. त्यामुळं शिंदेच्या विरोधात कोण? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

आमदार बबनदादा शिंदे सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून 

आमदार बबनदादा शिंदे यांचा माढा विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. सलग सहा वेळा ते माढा विधानसभेच्या निवडणुकीत निवडूण आले आहेत. साखर कारखाने, बँका, बाजार समित्या, जिल्ह्या दुध संघ यावर बबनदादा शिंदे यांचे वर्चस्व आहे. त्याचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे सध्या सोलापूर जिल्हा दुध संघाचे चेअरमन आहेत. तसेच बबनादादा शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत. त्यामुळं शिंदे कुटुंबियांचा माढा तालुक्यात मोठा संपर्क आहे.

मोहिते पाटलांच्या निर्णयाकडं सर्वांचं लक्ष

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीनंतर माढ्यात राजकीय समीकरणं बदलणार का? असा सवालही उपस्थिक केला जातोय. कारण लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर उभे होते. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील मैदानात होते. या निवडणुकीत मोहिते पाटलांनी मोठ्या मताधिक्क्यानं निंबाळकरांचा पराभव केला होता. यामध्ये विशेष बाब म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटलांना 52000 मतांचा मताधिक्य मिळालं आहे. या मतदारसंघावर आमदार शिंदे यांचं वर्चस्व आहे. त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील कोणाला पाठिंबा देणार की, त्यांच्याच परिवारातील उमेदवार उभा करणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

अभिजीत पाटील काय भूमिका घेणार?

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अभिजीत पाटील काय भूमिका घेणार हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. कारण, शरद पवारांचे खद्दे समर्थक म्हणून अभिजीत पाटील यांची ओळख होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी रणजितसिंह निंबाळकरांचे काम केले. राज्य सरकारनं त्यांच्या कारखान्याला अडचणीतून बाहेर आणण्याचे आश्वासन दिल्यामुळं त्यांनी लोकसभेला भाजपला मदत केली होती. मात्र, आता विधानसभेला ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, ते देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. सध्या माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे. त्यामुळं पंढरपूर तालुक्यतील मते ही खूप महत्वाची ठरतात .अभिजीत पाटील हे पंढरपूर तालुक्यातील आहेत. त्यामुळं ते माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.  

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget