एक्स्प्लोर

Madha Lok Sabha: मोहिते पाटलांची माढ्यात दणक्यात प्रचाराला सुरुवात; पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची डोकेदुखी वाढणार?

Lok Sabha Election 2024: आज पहिल्याच दिवशी करमाळा तालुक्यात श्रीदेवीचा माळ, पोथरे, कामोणे, बिटरगावश्री, आळजापूर, खडकी, जातेगाव, पुनवर, वडगाव आणि मांगी या गावात गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे.

Madha Lok Sabha Election 2024 : सोलापूर : माढा लोकसभेसाठी (Madha Lok Sabha Election 2024) इच्छुक असलेले मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil Group) यांना भाजपनं (BJP) डावलत पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील नाराज होते. दोन दिवसांपूर्वी या नाराजीचं महानाट्य खुद्द भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनाही अनुभवायला मिळालं होतं. यानंतर मोहिते पाटील यांची नाराजी भाजपाला परवडणारी नसल्याचं सांगत याबाबत पक्षश्रेष्टींना बोलणार असल्याचं आश्वासन संतप्त मोहिते समर्थकांना दिल्यावर महाजन यांची सुटका झाली होती. अजूनही भाजपकडून मोहिते पाटील यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला, तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आजपासून माढा लोकसभा मतदारसंघात अनौपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात केली आहे. 

आज पहिल्याच दिवशी करमाळा तालुक्यात श्रीदेवीचा माळ, पोथरे, कामोणे, बिटरगावश्री, आळजापूर, खडकी, जातेगाव, पुनवर, वडगाव आणि मांगी या गावात गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायची या मानसिकतेमध्ये असणारे मोहिते पाटील समर्थकांकडून शरद पवार यांची तुतारी घेण्याचा आग्रह सुरू असला तरी अद्याप मोहिते पाटील यांनी भाजप सोडण्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. असं असताना आजपासून धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून दौऱ्यासाठी करमाळा येथून सुरुवात केली आहे. यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार असून तातडीनं मोहिते पाटील प्रश्न सोडवला नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, बारामती, सोलापूर आणि माढा या चार लोकसभा मतदारसंघात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. 

विजयसिंह मोहिते पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्यानंतर त्यांच्या गटाचं नेतृत्व केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात मोहिते पाटील याना मानणारा मोठा वर्ग आहे. शरद पवार यांच्यानंतर सर्वात जास्त कार्यकर्त्यांची फळी जपणारा नेता म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांची ओळख आहे. हेच गणित डोक्यात ठेवून थेट नरेंद्र मोदी याना आणून 2019 मध्ये मोहिते पाटील याना भाजप मध्ये प्रवेश देण्यात आला होता. गेल्यावेळी पक्षाने दिलेला उमेदवार म्हणून रणजित निंबाळकर याना मोठा विजय देऊन राष्ट्रवादीच्या हातातून हा मतदारसंघ मोहिते पाटील यांनी खेचून आणला होता. 

यावेळी पहिल्यापासून मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेवर दावा केल्यानंतर त्यांनाच उमेदवारी मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र पक्षाने पुन्हा निंबाळकर यांनाच संधी दिल्याने मोहिते समराठक नाराज झाले. यानंतर माढा आणि निंबाळकर याना पाडा ही मोहीम समर्थकांनी सुरु केली. आता त्याचा पुढचा अंक म्हणून थेट मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून गावभेट दौऱ्याला सुरुवात करून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. 

दुसऱ्या बाजूला माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सहा पैकी पाच आमदारांनी भाजपने दिलेले उमेदवार रणजित निंबाळकर यांनाच विजयी करण्याचा निर्धार काल रात्री टेम्भूर्णी येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला. मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी झालेल्या महानाट्याचा दुसरा भाग काल टेम्भूर्णी  येथे पाहायला मिळाला होता. खासदार रणजित निंबाळकर यांनी बोलावलेल्या बैठकीस माळशिरस भाजप आमदार राम सातपुते, माण खटाव भाजप आमदार जयकुमार गोरे , सांगोला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील , माढा राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे, करमाळा आमदार संजयामामा शिंदे यांचेसह लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. यामुळे मोहितेपाटील विरुद्ध मतदारसंघातील बहुतांश आमदार असे चित्र असताना भाजप समोर मोठा पेच उभारला आहे. मोहिते पाटील नाराज झाले तर याचा दणका माढा व सोलापूर या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघाला बसणार असून याशिवाय बारामती, सातारा, सांगली आणि कोल्हापूर याही लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांची नाराजी भाजपाला अडचणीची ठरू शकणार आहे. मोहिते पाटील यांनी यापूर्वी माढा आणि सोलापूर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून दाखवला होता. शेजारचा बारामती मतदारसंघातही मोहिते पाटील यांचा मोठा कार्यकर्ता आहे. याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथेही  मोहिते पाटील यांच्या संस्थांचे जाळे आणि मोठा कार्यकर्ता संच असल्याने एक मोहिते पाटील पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची डोकेदुखी वाढवू शकणार आहेत.  यामुळेच सर्व घडामोडींवर शरद पवार यांचे बारीक लक्ष ठेवले  असून भाजपने डावलल्यास मोहिते पाटील यांच्या सारखा दुरावलेला मोठा नेत्यात  हातात तुतारी देऊन पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला अडचणीत आणायची संधी पवार  सोडणार नाही. याची जाणीव भाजपला असल्यानेच गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची नाराजी भाजपाला परवडणारी नसल्याचे सांगितले आहे. आता निर्णय भाजपाला घ्यायचा असून मोहिते पाटील यांनी आता थेट गावभेटीतून बंडखोरीचे संकेत दिले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget