एक्स्प्लोर

माढ्यात 60 टक्के मतदान, निंबाळकरांना साताऱ्यात, मोहिते पाटलांना माळशिरमध्ये लीड मिळण्याची शक्यता, मात्र, 'जरांगे इफेक्ट'मुळे धाकधूक

Madha Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभेत 11 लाख 92 हजार 190 म्हणजे जवळपास 60 टक्के मतदान झालं आहे.

Dhairyasheel Mohite Patil vs Ranjit Singh Nimbalkar: सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) मतदानाच्यावेळी अत्यंत चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे एकंदरीतच माढ्याचा (Madha Constituency) निकाल अत्यंत अटी-तटीत सुटणार अशा चर्चा गाव-खेड्याच्या पारावर सुरू आहेत. फलटण आणि माण खटावमध्ये भाजप उमेदवार खासदार रणजित निंबाळकर यांना भरभरून मतदान झाल्याच्या चर्चा आहेत. तर माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांना भरभरून मतदान झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे निकालाचा अंदाज वर्तवणं तसं अवघडंच आहे. मतदारराजाचा कौल मतपेटीत बंद झालाय, सर्वांना आतुरता आहे, 4 जूनच्या मतमोजणीची. त्यामुळे माढ्यात गुलाल कोण उधणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. 

दिवसभर असणारे 44 डिग्री पेक्षा जास्त अपमानामुळे सकाळी लवकर आणि संध्याकाळीपूर्वी ठिकठिकाणी मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. माढा लोकसभेत 11 लाख 92 हजार 190 म्हणजे जवळपास 60 टक्के मतदान झालं आहे. यात सर्वात जास्त मतदान हे फलटण येथे 64 टक्के तर सर्वात कमी मतदान करमाळा येथे 55 टक्के झालं आहे. माढा तालुका 61 टक्के, माळशिरस 60 टक्के, माण 58 टक्के मतदान झाले. मतदानाच्या वेळी सर्वात तणावपूर्ण स्थिती सांगोला तालुक्यात होती. सांगोला तालुक्यात देखील 60 टक्के मतदान होताना हाणामारी आणि बाचाबाचीच्या घटना समोर आल्या होत्या. यात बागलवाडी येथे एका तरुणानं थेट ईव्हीएम मशीन जाळण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सुदैवानं मशीनला कोणताही धोका न पोचल्यानं पुनर्मतदान घेण्याची वेळ आली नाही. करमाळा शहरामध्ये दिवसभर शांततेत मतदान झालं असताना संध्याकाळी एका तरुणानं खिशात आणलेल्या हातोडीनं ईव्हीएम मशीन फोडण्याचाही प्रयत्न केला. 

माढ्यात मनोज जरांगे इफेक्टनं धाकधूक वाढवली 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत मनोज जरंगे यांचा इफेक्ट माढा, सांगोला आणि करमाळा तालुक्यात चांगलाच जाणवला. या तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदारांनी मराठा आरक्षणामुळे आपला राग सत्ताधारी भाजपवर काढल्याचं चित्र दिसत होतं. याचवेळी ओबीसी मतदारांनीही भाजपाला भरभरून मतदान केल्याचे समोर आले . या मतदानात जरांगे फॅक्टर सरस ठरणार कि ओबीसी मतदान हे देखील 4 जून रोजी समोर येणार आहे . माढा विधानसभा मतदारसंघातील आमदार बबनदादा शिंदे आणि शिवसेनेचे शिवाजी सावंत हे दोन्ही प्रमुख गट एकत्र आल्याने बहुतांश ठिकाणी मनोमिलन झालेले दिसले असले तरी काही ठिकाणी मात्र एक गट तुतारीच्या मागे गेला आहे . सांगोला तालुक्यातही अश्याच प्रकारची स्थिती असून आमदार शहाजीबापू आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी संपूर्ण ताकद लावल्याने या भागात जरांगे इफेक्ट कमी दिसला . 

माढ्याचा निकाल खरा फलटण आणि माण खटाव विरुद्ध माळशिरस यावरच ठरणार आहे. इतर मतदारसंघात कोठेही कोणत्याच पक्षाला मोठे लीड मिळण्याची शक्यता नाही. यात सर्वात महत्वाचा असणारा वंचित फॅक्टर किती चालणार आणि तो कोणाची मतं घेतं यावर संपूर्ण निकाल अवलंबून असणार आहे. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम समाज हा शरद पवार गट आणि वंचित या दोघात विभागाला जाणार आहे. याच पद्धतीनं दलित मतात देखील यावेळी मोठी विभागणी झाली असून आज माढ्याचा नेमका अंदाज बांधणं शक्य नाही, तरी येणाऱ्या निकालात भाजपचे निंबाळकर किंवा राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते यांच्यात जिंकणाऱ्याचं मताधिक्य हे 15 ते 25 हजारात असणार असल्याचं बोललं जातं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??

व्हिडीओ

Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
Sunil Shelke on NCP Merger: 'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
Mumbai Mayor : बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Embed widget