श्रीकांत शिंदेंसाठी लोकसभा निवडणूक सोप्पी नसेल, सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Lok Sabha elections 2024 : मुख्यमंत्री स्वतःचे प्रोजेक्शन शेतकरीपुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदे यांचा प्रोजेक्शन शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत. श्रीकांत शिंदे हे अत्यंत गर्भश्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी कल्याणमध्ये केली.
Lok Sabha elections 2024 : कल्याणमधील वाढती गुन्हेगारी ,वाढती ठेकेदारी यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणा सुद्धा दहशतीखाली आहे. दस्तूरखुद्द भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे साहेबांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घातल्या. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधला अंतर्गत गँगवॉर किती टोकाला पोहोचला हे दिसून येते. या परिस्थितीत निश्चितपणे वाटतं येणारी निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही, जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे, असा टोला सुषमा अंधारे यांनी श्रीकांत शिंदे यांना लगावला. मुख्यमंत्री स्वतःचे प्रोजेक्शन शेतकरीपुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदे यांचा प्रोजेक्शन शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत. श्रीकांत शिंदे हे अत्यंत गर्भश्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी कल्याणमध्ये केली.
पक्षाने सांगितलं तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल -सुषमा अंधारे
ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी माझं नाव चर्चेत आहे पण मला त्याबाबत अधिकृत निरोप नाही, मला फक्त काम करायचंय. पक्षाने मला सांगितलं तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल, असं सूचक विधान केलं. पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणजे फार मोठा अडचणीचा डोंगर असं वाटत नाही. आम्हाला त्यांच्याशी समोर सामोरे जाताना फार मोठं आव्हान आहे, असं वाटत नाही. पक्षाने मला अजून सांगितलं नाही असं स्पष्ट केलं नाही. मुक्त संवाद अभियानांतर्गत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा आज कल्याण दौरा होता, या दौरादरम्यान त्यांनी अग्रवाल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी कोळशेवाडी शहर शाखेत पत्रकार परिषद घेतली, संध्याकाळी सुषमा अंधारे यांचे वाळधुनी परिसरात जाहीर सभा होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आढेवेढे न घेता थेट निशाने साधावेत - सुषमा अंधारे
सुषमा अंधारे यांनी आज कल्याण मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्याणच्या गुन्हेगारीसह मनोज जलंगे यांच्या एसआयटी चौकशीवरून सरकारला लक्ष केलं. आता अंधारात नाही तर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात हे दोघेही सरकार पक्षातले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील विस्तृत जण बँक वरचा स्वरूप घेत असल्याचे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. सरकारने मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी चौकशी लावण्याचे आदेश दिलेत, याबाबत बोलताना सरकारने ही चौकशी करायला हरकत नाही. मात्र त्यासोबतच मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण एसटी आरक्षणाच्या लढ्यात जे तीन-चारशे लोक मेलेत त्यांचे एसआयटी चौकशी सरकार लावणार आहे का ? सरकारला जर एवढी एसटी चौकशी लावण्याचे हौस असेल तर भीमा कोरेगावच्या एसआयटी चौकशीचे काय झालं ? यावर सरकारने उत्तर दिलं पाहिजे , आत्तापर्यंत अफरातफरी गोंगाट आणि गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले. त्याचे एसआयटी चौकशीचा काय समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे 28 ते 30 लोक एकाच वेळेला गेले, हे सगळे अपघात होतात याची एखादी चौकशी सरकारी लावणार आहे का ? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.