Uday Samant: रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेचीच मात्र मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून माघार घेतली: उदय सामंत
Uday Samant: शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माघार घेतली. रत्नागिरीची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.
नागपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत (Kiran Samant) यांनी माघार घेतली, मात्र त्या जागेवर आमचा दावा कायम आहे अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. काल रात्रीचा निर्णय भावनिक होता. मात्र ही जागा आमच्याकडेच राहावी अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. शिंदेंना वाटाघाटी कराव्या लागतात याचं वाईट वाटतं, अशी खंत देखील त्यांनी या वेळी व्यक्त केली . ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून तिकीट मिळवण्याच्या शर्यतीतून किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील व्हायरल झाली मात्र किरण सामंतांकडून ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
उदय सामंत म्हणावे, रत्नागिरी-सिंधुदुर्गावर शिवसेनेचा दावा आहे. मात्र अंतिम निर्णय शिंदे घेतील. आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. किरण सामंत यांनी ट्विट मागे घेतलं आहे. आमच्याकडून शिवसेनेकडून एकच उमेदवार आहे. काल रात्रीचा निर्णय भावनिक होता. शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माघार घेतली. उद्या रत्नागिरीला बैठक घेऊ. रत्नागिरीची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांची भावना आहे ही जागा शिवसेनेकडे असावी.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तीन वाजता महायुतीची बैठक
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज दुपारी तीन वाजता महायुतीची बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, उदय सामंत, किरण सामंत, निलेश राणे आणि आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसंच, आज दुपारी 12 वाजता महायुतीचा मेळावा पार पडणार आहे, या मेळाव्याला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
तिकीट देण्याचा अधिकार मुख्यमंत्री शिंदेंचा : उदय सामंत
तिकीट देण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. आम्ही राज्यात 45 पार नक्की जाऊ, फॉर्म्युला ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे आगे. जो काही फॉर्म्युला ठरेल तो आम्हा कार्यकर्त्यांना मान्य असेल, असेही उदय सामंत म्हणाले.
किरण सामंतांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे. अजूनही शिवसेनेचा दावा जर रत्नागिरी- सिंधुदुर्गच्या जागेवर असेल तर कोकणातील स्थानिक नेते नारायण राणे याला उत्तर काय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही जागा शिवसेनेला सोडली तर राज्याच्या राजकारणातील ही सर्वात मोठी घडामोड असेल.
हे ही वाचा :