एक्स्प्लोर

Lok Sabha Election: सुजय विखे, संदीपान भुमरे ते वसंत मोरे, स्वत:ला मतदान करु शकले नाहीत, कारण....

अहमदनगरमधून सुजय विखे-पाटील, छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे  आणि पुण्यातून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहे.   पण या   तीन उमेदवारांना स्वतःला मतदान करता येत नाही.

मुंबई राज्यातील  चौथ्या टप्प्यातील  मतदानाला (Lok Sabha Election)  सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालीय. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकात कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. परंतु  सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि वसंत मोरेंना (Vasant More)  या तीन उमेदवारांना  मतदान करता आले नाही. कारण तिथल्या मतदारयादीत त्यांची नोंद नसल्यानं त्यांच्यावर ही वेळ आली आहे. 

अहमदनगरमधून सुजय विखे-पाटील, छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे  आणि पुण्यातून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहे.   पण या   तीन उमेदवारांना स्वतःला मतदान करता येत नाही. ज्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत, तिथल्या मतदार यादीत त्यांची नोंद नसल्यानं त्यांच्यावर ही वेळ आलीय. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधले महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचा समावेश आहे. संदीपान भुमरेंचं मतदान जालना मतदारसंघातल्या पैठणमध्ये आहे, सुजय विखेंचं नाव शिर्डी मतदारसंघातल्या लोणीमधल्या मतदारयादीमध्ये आहे तर वसंत मोरे यांचं नाव कात्रजमधल्या मतदारयादीत असून हा भाग शिरुर मतदारसंघाला जोडलेला आहे. 

कोण आहेत सुजय विखे पाटील?

डॉ. सुजय विखे-पाटील यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना उभारला होता.   सुजय विखे पाचलांनी भाजपकडून 2019 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक नगरमधून लढवली आणि ते विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा त्यांनी पराभव केला होता. आता ते महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने लक्षवेधी ठरत असते. यंदा ते महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.  

कोण आहेत वसंत मोरे?

मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे वंचितकडून निवडणूक लढवत होते.  वसंत मोरे यांची स्वतःच्या जीवावर निवडून येणारे नेते अशी ओळख आहे. वसंत मोरे हे लोकसभेसाठी निवडणक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी मनसेचा राजीनामा देत वंचितकडून निवडणूक लढवत आहे. 2007 साली पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेने 8 नगरसेवक निवडून आणले होते. मनसेच्या या यशात वसंत मोरेंचा सिंहाचा वाटा होता. वसंत मोरे या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. राज ठाकरे यांच्यासोबत गेल्या 28 ते 29 वर्षांपासून होते.

हे ही वाचा :

बाळासाहेब असते तर यांना जोड्याने मारलं असतं, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, पालघरच्या सभेत वीजेचा लपंडाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget