बाळासाहेब असते तर यांना जोड्याने मारलं असतं, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, पालघरच्या सभेत वीजेचा लपंडाव
पालघर जिल्ह्यावर आज अवकाळी पावसाचे सावट असून सभा सुरू असताना ढगाळ वातावरण निर्माण झालेले आणि ढगांचा गडगडाट सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांनी शेवटी आपलं भाषण आटोपत घेत ते वसईच्या सभेसाठी रवाना झाले.
![बाळासाहेब असते तर यांना जोड्याने मारलं असतं, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, पालघरच्या सभेत वीजेचा लपंडाव CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray on Alliance With Congress Palghar Lok Sabha Election Hemant Savara Maharahtra Marathi News बाळासाहेब असते तर यांना जोड्याने मारलं असतं, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, पालघरच्या सभेत वीजेचा लपंडाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/73505d0b944e27fd34240f3f2b66f982171559129348589_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा (Hemant Savara) यांच्या प्रचारासाठी पालघर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान पाच मिनिटात दोनदा लाईट गेली. वीज पुरवठा खंडित झाल्याने मुख्यमंत्रीच भाषण पाच मिनिटांमध्ये दोन वेळा थांबलं. महायुतीच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री आज मनोरच्या सायलेंट रिसॉर्ट येथे आले होते. पालघर जिल्ह्यावर आज अवकाळी पावसाचे सावट असून सभा सुरू असताना ढगाळ वातावरण निर्माण झालेले आणि ढगांचा गडगडाट सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांनी शेवटी आपलं भाषण आटोपत घेत ते वसईच्या सभेसाठी रवाना झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही निवडणूक फक्त पालघर पुरती मर्यादित नाही आहे. ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. त्यामुळे या निवडणुकीत एकच लक्ष्य आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री आणि हेमंत सावरा यांनी पहिली बार खासदार बनवायचे आहे. उमेदवार कोणाचा या पेक्षा उमेदवार महायुतीचा हे महत्त्वाचं आहे. महायुतीचे काम आपल्या समोर आहे. सगळ्यांसाठी निर्णय घेतले.हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. 24 तास काम सुरू आहे. म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसला जवळ केले : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले, पालघर हा आपला बालेकिल्ला आहे. बाळासाहेब दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. तो आपला कायम राहिला पाहिजे. राहुल गांधीच लॉन्चिंग होत नाही. पन्नास वर्षांपासून लॉन्चिंग सुरू आहे. राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात. आता उबाठा त्यांच्यासोबत आहे. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसला जवळ केलं. बाळासाहेब असते तर यांना जोड्याने मारलं असते. कोण खरं कोण खोटं हे मोदींनी सांगितलं आहे. हे मला पण चांगलं माहीत आहे.
शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री चालत नाही का? मुख्यमंत्र्यांचा सवाल
मोदी निवडून आले आणि इकडे दुसरा कोण निवडून आला तर विकासाला मुकाल... मोदी प्रधानमंत्री होणार ही काळ्या दगडावर भगवी रेष आहे. मला रोज शिव्या शाप देतात. शेतकऱ्याचां मुलगा मुख्यमंत्री चालत नाही का? मला नाही पण दुसऱ्या कोणाला तरी मुख्यमंत्री बनवायचं होत. पण तुम्ही स्वतःच उडी मारून बसले, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना टोला लगावला आहे.
लोक प्रकल्प सुरू करणाऱ्यांना मतदान करणार : मुख्यमंत्री
देशाच्या राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या आहेत. संविधान बदलणार म्हणून टीका करतात. लंडनच स्मारक मोदींनी केलं, संविधान दिन देखील काँग्रेसला आठवला नाही, आता मोदींनी सुरू केलं. कामाच्या जोरावर यांना आपण हरवू शकत नाही हे विरोधकांना समजले आहे. जबतक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान रहेगा... सरकार आल्या आल्या गोविंदा उत्सव सुरू केला. राज्यातील अनेक प्रकल्प बंद पाडले हे आम्ही सुरू केले आहे. लोक प्रकल्प सुरू करणाऱ्यांना मतदान करणार असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हे ही वाचा :
Lok Sabha Election 2024: पहिल्या सहा तासात पुण्यात सर्वात कमी तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान; नगर, बीडमध्ये किती?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)