Lakshaman Hake: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
या उपोषणानंतर दोघांवरही जालन्यातील वीरा हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. आज त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Lakshman Hake: ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना गेल्या तीन दिवसांच्या उपचारानंतर आज दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जालन्यात उपोषणानंतर वीरा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. डिस्चार्ज झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली असून जरांगेंचा गरजवंतांचा लढा आता राजकारणावर येऊन थांबला असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या नेत्यांनी जरांगेंच्या समर्थनात वतव्य केली त्यांच्यावरही जोरदार टिकेची झोड हाकेंनी उठवली.
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान आज ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणानंतर त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
ओबीसी उपोषणानंतर तीन दिवस उपचार होते सुरू
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालन्यात वडीगोद्री गावात उपोषण सुरू होते. या उपोषणानंतर दोघांवरही जालन्यातील वीरा हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. आज त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी मराठा आरक्षण विषयावरून त्यांनी आंदोलन मनोज रंगींची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे दिसले. मराठा तरुणांच्या गोंधळलेल्या स्थितीला आणि आत्महत्यांना मनोज जरांगे जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
'मराठा तरुणांच्या गोंधळलेल्या स्थितीला मनोज जरांगे जबाबदार'
मराठा तरुणांच्या गोंधळलेल्या स्थितीला आणि आत्महत्यांना मनोज रंगे नावाचा माणूस जबाबदार असल्याचा आरोप ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी केला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी जरांगेंचा गरजवंतांचा लढा आता राजकारणावर येऊन थांबल्याचा आरोप ही त्यांनी केलाय. यावेळी गणपती बसवल्यासारखं मनोज रंगे यांना शरद पवारांनी आणून बसवल्याचा आरोपही त्यांनी केला.
..तर अफगाणिस्तान ला राहायला जावं
जरांगेंचा गरजवंतांचा लढा तर राजकारणावर येऊन थांबला असल्याचा आरोप करत वंचित बहुजनचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेचा समर्थन हाकेंनी केलं. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांना जातीय भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी त्यांना अफगाणिस्तानला राहायला जावं, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी गणपती बसवल्यासारखे मनोज जरांगे यांना शरद पवारांनी आणून बसवल्याचे वक्तव्य हाकेंनी केले आहे.
हेही वाचा: