एक्स्प्लोर

Kisan Kathore on Badlapur Case : आंदोलक बदलापूरचे रहिवासी नाहीत, ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी; भाजप आमदाराचा दावा

Kisan Kathore on Badlapur Case : बदलापूरमध्ये  चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान आज सकाळपासून रेल्वे स्थानकावर बदलापूरसह अनेक भागातील लोकांनी रेल्वे रोको केलाय.

Kisan Kathore on Badlapur Case : बदलापूरमध्ये  चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान आज सकाळपासून रेल्वे स्थानकावर बदलापूरसह अनेक भागातील लोकांनी रेल्वे रोको केलाय. अजूनही बदलापूर रेल्वे स्थानकावरिल परिस्थिती जैसे थे आहे. पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आंदोलक रेल्वे स्थानकावरुन हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. आजूबाजूच्या शहरातील पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या प्रकरणावर भाजप आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

किसन कथोरे काय काय म्हणाले? 

किसन कथोरे म्हणाले, सकाळी आंदोलन भरटकलं. शाळा बाजूला राहिली आणि रेल्वेमध्ये घुसले. रेल्वेमध्ये घुसलेले आरोपी बदलापूरचे राहिवासी नाहीत. सगळी बाहेरुन आलेली मंडळी आहे. शाळेतील वातावरण आता शांत झालं आहे. शाळेतील मुख्याध्यापकावर कारवाई झाली. कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. संस्थाचालकांची चौकशी सुरु केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करण्यास सुरुवात केली. ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी आहे. बदलापूरकरांना आज वेठीस धरण्यात आलं आहे. हे योग्य नाही. सर्वांना माझी विनंती आहे, शांतता राखावी. या प्रकरणाचे कोणीही राजकारण करु नये. स्वत: उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आदेश दिले असतील. नागरिकांनी संयम पाळला होता. बाहेरुन आलेल्या मंडळींनी रात्रीत बॅनर तयार केले आणि बदलापूरमध्ये लागले. लाडकी बहीणचं मानधन देऊ नये, आम्हाला न्याय द्यावा. हे बॅनर उल्हासनगर वगैरे भागातून आले. हे कोणीतरी ठरवून केलं. 

देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांची त्वरित नियुक्ती करण्यात आली आहे.तात्काळ चार्जशीट दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल. अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभाग प्रयत्नशील राहील.

बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत, असंही सीएमओ ऑफिसकडून सांगण्यात आलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या दिशेने बाटली भिरकावली, बदलापुरात आंदोलकांचा रुद्रावतार; 'फाशी द्या'च्या घोषणा सुरुच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार
Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार
Sharad Pawar VIDEO : मोदी भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपतात, त्यावर राजकीय आरोप करायचे नसतात; शरद पवारांकडून पंतप्रधानांचं कौतुक
मोदी भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपतात, त्यावर राजकीय आरोप करायचे नसतात; शरद पवारांकडून पंतप्रधानांचं कौतुक
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
Bhausaheb Wakchaure : दोनच दिवसात ठाकरेंचा तिसरा खासदार शिंदेंच्या नेत्याच्या भेटीला, शिर्डीच्या खासदाराने घेतली उदय सामंतांची भेट
दोनच दिवसात ठाकरेंचा तिसरा खासदार शिंदेंच्या नेत्याच्या भेटीला, शिर्डीच्या खासदाराने घेतली उदय सामंतांची भेट

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chemist Strike : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती
औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
PM Modi and Meloni: वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत सेल्फी, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट व्हायरल
PM Modi: वेलकम टू रोम, माय फ्रेंड! पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनींचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
Pandharpur Vitthal Temple : धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Embed widget