KCR Bihar Visit: केसीआर घेणार नितीश कुमारांची भेट, पाटण्यात होणार 2024 च्या निवडणुकीवर चर्चा
KCR Bihar Visit: टीआरएस (TRS) प्रमुख आणि तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव बुधवारी बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पाटणा येथे ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांची भेट घेणार आहेत.
KCR Bihar Visit: टीआरएस (TRS) प्रमुख आणि तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) बुधवारी बिहारच्या (Bihar) दौऱ्यावर जाणार आहेत. पाटणा येथे ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (General Election) रणनीतीवर देखील दोन्ही नेते चर्चा करू शकतात.
तेलंगणामध्ये पुढील वर्षी 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच तेलंगणा विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. अलीकडेच नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडून आरजेडी-काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर नितीश कुमार यांनी 2024 मध्ये विरोधी पक्षांच्या एकजुटीबद्दल अनेक वेळा बोलले आहेत.
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाणार
मिळालेल्या माहितीनुसार, केसीआर बुधवारी सकाळी हैदराबाद विमानतळावरून पाटणाकडे रवाना होतील. केसीआर आणि नितीश कुमार पाटणा येथील गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार आहेत. यासोबतच तेलंगणात नुकत्याच झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बिहारमधील 12 कामगारांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक मदत देणार आहे. यानंतर दोन्ही मुख्यमंत्री दुपारच्या जेवणानंतर राष्ट्रीय राजकारणावर चर्चा करतील, असे सांगण्यात येत आहे.
याच दरम्यान, सोमवारी केंद्र सरकारवर निशाणा साधत केसीआ म्हणाले की, 2024 मध्ये भाजपमुक्त भारत करण्याचा संकल्प केला पाहिजे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांचे सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केला. पेडापल्ली येथे जाहीर सभेला संबोधित करताना केसीआर म्हणाले की ते (पंतप्रधान मोदी) आणि केंद्र जे काही बोलतात ते सर्व खोटं आहे. केसीआर म्हणाले की, आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे आणि 2024 मध्ये भाजपमुक्त भारत बनवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. हा नारा देत पुढे जायला हवे. तरच आपण देशाला वाचवू शकतो, अन्यथा देशाला वाचवण्याचा दुसरा मार्ग नाही. दरम्यान, याआधीही केसीआर यांनी अनेक बिगर भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. ते 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
आपची मोठी घोषणा; नायब राज्यपालांच्या विरोधात सर्व आमदार आज रात्री विधानसभेत राहणार, वाचा संपूर्ण प्रकरण
Mamata Banerjee Slams BJP: महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी पैसा कुठून आला, ममता बॅनर्जींचा भाजपला सवाल