Jyoti Mete on Beed Loksabha : लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पाठिंबा की बजरंग सोनवणेंना? ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं
Jyoti Mete on Beed Loksabha : "आमच्या राज्यकारणीची आज (दि. 27) बैठक झाली. आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे मत ऐकून घेतले. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाले आहेत.
![Jyoti Mete on Beed Loksabha : लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पाठिंबा की बजरंग सोनवणेंना? ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं Jyoti Mete on Beed Loksabha Support Pankaja Munde or Bajrang Sonawane in Lok Sabha elections? Jyoti Mete said clearly Maharashtra Politics Marathi News Jyoti Mete on Beed Loksabha : लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पाठिंबा की बजरंग सोनवणेंना? ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/d4049ecee4cf82d2fdf10779aa67129b1714213550925924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jyoti Mete on Beed Loksabha : "आमच्या राज्यकारणीची आज (दि. 27) बैठक झाली. आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे मत ऐकून घेतले. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाले आहेत. उरलेल्या जागांवर मतदान होणे बाकी आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही तटस्थ भूमिका घेणार आहोत. शिवसंग्राम संघटना कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार नाही", असे शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योती मेटे (Jyoti Mete) म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटेंनी (Jyoti Mete) शिवसंग्रामची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
बीडची जागा लढवावी अशी जनतेची मागणी होती
ज्योती मेटे (Jyoti Mete) म्हणाल्या, आम्ही विधानसभेची जागा लढवणार आहोत. ज्यांची मदत करावी लागेल. महायुतीच्या नेत्यांना सांगायचं म्हणजे आता जाहीरपणे सांगतोय की, राजकारणात अनुषंगिक भूमिका आहे. नाराजीचा प्रश्न उद्भवत नाही. बीडची जागा लढवावी अशी जनतेची मागणी होती. मी लोकसभा लढवणार नाही. जनतेच्या हिताचा विचार करून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही आढावा घेतला.
संघटनेचे हीत विचार करून आम्ही निर्णय घेतला आहे
आम्ही तटस्थ भूमिका घेतोय. कुठल्याच पक्षाला पाठिंबा देणार नाही. युतीमधून बाहेर पडतोय का वगेरे तुम्ही तुमच्या पद्धतीनं अर्थ लावताय. आमची संघटना लोकसभा लढवत नाहीय. संघटनेचे हीत विचार करून आम्ही निर्णय घेतला आहे. लोकसभा झाल्यावर विचार करू मग विधानसभेला कोणता निर्णय घेणार हे सांगू, असं ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी स्पष्ट केलं आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे
भारतीय जनता पक्षाने बीडमधून (Beed Loksabha) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवले आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक थोडी वेगळी आहे. कारण दरवेळी त्यांच्या विरोधात काम करणारे त्यांचे बंधू आणि मंत्री धनंजय मुंडे या निवडणुकीत मात्र, त्यांच्या सोबत आहेत. दुसरीकडे बजरंग सोनवणेंसाठी शरद पवारांनी ताकद लावली आहे. बजरंग सोनवणे जिल्हा परिषदेचे राजकारणातून पुढे आले. 2019 च्या लोकसभा (Beed Loksabha) निवडणुकीत त्यांनी प्रीतम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
'मी पद्मसिंह पाटील अन् राणांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है', ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना थेट इशारा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)