Jitesh Antapurkar : काँग्रेसचे माजी आमदार जितेश अंतापुरकरांचा भाजपमध्ये प्रवेश, देवेंद्र फडणवीस म्हणाले, लवकरच अशोक चव्हाणांचे इतर सहकारी भाजपमध्ये येतील
Jitesh Antapurkar, मुंबई : माजी आमदार आणि काँग्रेस नेते जितेश अंतापूरकर यांनी आज (दि.30) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. विधान परिषद निवडणुकीत अंतापूरकर यांनी क्रॉस वोटींग केल्याचा आरोप करण्यात आला होता.
Jitesh Antapurkar, मुंबई : माजी आमदार आणि काँग्रेस नेते जितेश अंतापूरकर यांनी आज (दि.30) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. विधान परिषद निवडणुकीत अंतापूरकर यांनी क्रॉस वोटींग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ते सातत्याने भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत प्रवास करतानाही दिसले होते. शिवाय अंतापूरकर यांनी पत्रकारांशी बोलणेही टाळले होते. अखेर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जितेश अंतापूरकर काय म्हणाले?
जितेश अंतापूरकर म्हणाले, अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यापासून माझ्या मतदारसंघांमध्ये चांगले काम होत आहेत. मागच्या काळातलं टीकाटेपणीचा सत्र जे चालू झालं विधान परिषदेनंतर त्यामुळे मला दुःख झालं. हे सगळं विचार करून मी वेगळी वाट निवडली. यापुढे अजून आमदार येऊ शकतात. विकासाचा काम हे भाजपा सरकार आणि महायुती सरकार करत आहे.
अशोक चव्हाण काय काय म्हणाले?
अडीच वर्षांपूर्वी पोटनिवडणूकीमध्ये जितेश अंतापूरकर निवडून आले होते. ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत . त्यांचे वडील रावसाहेब अंतापुरकर आमचे जुने सहकारी होते. त्यांना मागील सहा महिन्यात चांगली वागणूक काँग्रेसमध्ये मिळाली नाही. मी पक्षप्रवेश केल्यावर , मी त्यांना भाजपा मध्ये या म्हणालो नाही. त्यांनी सांगितले की मला आपल्या सोबत काम करायचे आहे. आगामी काळात भाजपाला यश जितेशमुळे होईल.
लवकरच, अशोक चव्हाण यांचे इतर सहकारी भाजपमध्ये येतील
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे नांदेड जिल्ह्यातील तरुण आमदार जितेश अंतापुरकर यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण साहेब यांच्या सोबत त्यांचे वडील रावसाहेब यांनी अतिशय जवळून काम केले आहे . त्यांच्या दुःखद निधन झाल्यानंतर जितेश निवडून आले. त्यांनी त्यांचा अनुभव आताचा सांगितला. अनेक जुने लोक भाजपाचे नांदेडमध्ये काम करतात. अशोक चव्हाण यांच्या मुळे आम्हला ताकद मिळाली. हळूहळू त्यांच्या सोबत काम करणारे सहकारी सोबत येत आहेत. एक सेटिंग आमदार असून देखील हा निर्णय त्यांनी घेतला. त्यांचे मी आभार मानतो. नांदेड लोकसभेची जागा आपण कमी मतांने हरलो. त्यावेळी फेक नेरेटिव्ह होता. लोकसभेनंतर वातावरण बदलले आहे. लवकरच, अशोक चव्हाण यांचे इतर सहकारी भाजपमध्ये येतील.
इतर महत्वाच्या बातम्या
जो माणूस आदल्या जन्मी पाप करतो, तो पुढील जन्मी साखर कारखाना टाकतो किंवा वर्तमानपत्र काढतो : नितीन गडकरी