एक्स्प्लोर

Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Jitendra Awhad on Indrajeet Sawant : "लंडनहून आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही पुरावा नाही. खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत"

Jitendra Awhad on Indrajeet Sawant : "लंडनहून आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही पुरावा नाही. खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत", असा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला होता. दरम्यान सावंत यांच्या दाव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे. ट्वीटरवर व्हि़डीओ पोस्ट करत भाजपला भावनिक राजकारण करण्याची सवय आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

जितेंद्र आव्हाड काय काय म्हणाले? 

जितेंद्र आव्हाड ट्वीटरवर लिहितात, अफझलखानाचे पोट फाडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही आणणार, असा गाजावाजा या सरकारने केला होता. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत, असा दावाही केला होता. त्याचवेळेस आम्ही सांगितले होते की, त्या वाघनखांची खरी माहिती कोणालाच नाही. त्यामुळे  छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली हीच वाघनखे आहेत, असे म्हणता येणार नाही. पण, भावनिक राजकारण करून लोकांना आपल्याकडे वळविण्याची सवय असल्याने 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरली होती', अशी घोषणा सरकारनेच करून टाकली. आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या व्यवस्थापनाने पत्र लिहून, ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा इतिहासकार इंद्रजित सावंत यांना कळविले आहे की, " म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही अन् तसे आम्ही कधी सांगितलेलेही नाही." म्हणजेच भावनिक राजकारण करता करता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्रास्रांविषयी खोटी माहिती महाराष्ट्रातील तमाम श्रद्धाळू लोकांपर्यंत पोहचवित आहेत.  कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांशी तरी राजकारण करू नका !

महाराष्ट्रातील मंत्री धादंत खोटे बोलत आहेत, हा शिवाजी महाराजांचा अपमान 

जी गोष्टी छत्रपती महाराजांची नाही ती गोष्ट महाराजांची आहे, असं राज्यातील एक मंत्री सांगत आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहेत. वाघनखांसाठी जे संग्रहालय तयार करण्यात येत आहे, त्यासाठी आठ कोटी खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय 30 कोटींचा खर्च करत फक्त तीन वर्षासाठी असणार आहे. तसेच  त्याचे टेंडर देखील महाराष्ट्राबाहेरील कंपनीला देण्यात आले आहे. ही महाराष्ट्राची फसवणूक असून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीतच, खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजित सावंतांचा मोठा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Budget : पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : दुपारी 3 च्या हेडलाईन्स : TOP Headlines 3PM 01 February 2024Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदेUnion Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025CM Devendra Fadnavis On Union Budget :  मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Budget : पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Embed widget