एक्स्प्लोर

Jayant Patil Resigns: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष!

Jayant Patil Resigns:15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. 

Jayant Patil Resigns: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील (Jayant Patil) पायउतार झाले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. गेल्या काही दिवसांआधी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, अशी मागणी केली होती. 

मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी 10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनीच केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. शरद पवारांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. 

शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध होताच शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही, पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील  आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावं चर्चेत आहेत, माझंही नाव चर्चेत आहेत. ज्यावेळेला निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणानं काम करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले. शशिकांत शिंदे पुढं म्हणाले, आणखी कुणाची नावं चर्चेत आहेत याबद्दल कल्पना नाही. मला तुमच्याकडून कळलेलं आहे. संघटनेच्या माध्यमातून पवारसाहेबांनी या महाराष्ट्रात इतिहास घडवला काम केल, पक्ष संघटना बांधली आहे. आज पक्षाच्या माध्यमातून काम करण्याच्या बाबतीत संघर्षाचा काळ आहे. त्यावेळेला निश्चितपणानं लोकांना अपेक्षित अशा प्रकारचं नेतृत्व पवार साहेबांनी उभं केलेलं आहे. जयंत पाटील यांच्या सारख्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही, असंही शिंदे यांनी म्हटलं. प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही, पक्षाची बैठक आहे एवढाच निरोप आलेला आहे. निर्णय काय होईल तो होईल, पक्ष बांधण्याच्यासाठी संघर्षात आम्ही  एकजुटीनं, एकोप्यानं उभं राहू, साहेबांच्या पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न 100 टक्के करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले. 

नव्या लोकांना संधी देणार- शशिकांत शिंदे

बेरोजगारीचा प्रश्न आहे, आश्वासनं आहेत, 75 हजार नोकऱ्या लगेच देतो, निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरात होईल हे लोकांना पटवून द्यायचं आहे. इनकमिंग आऊटगोईंग होत असते, नवीन लोकांना संधी देणे त्यांच्याकडन नेतृत्व उभं करणं हा साहेबांचा गुण आहे. कोण जातंय, लगेच यश मिळालं पाहिजे यापेक्षा, राजकीय सामाजिक चळवळीत लोक इच्छुक आहेत त्यांना पुढं आणलं तर महाराष्ट्रात बदल घडवण्याची क्षमता आहे. सत्ता बदलते दिसल्यावर बरेच लोक मार्ग बदलात. सध्याच्या प्रकरणांवरुन जनता नाराज आहे हे तुम्हाला दिसून येईल, असं शशिकांत शिंदे म्हणाले. मला जर संधी मिळाली तर ते भाग्य समजेन, शरद पवार साहेब माझे दैवत आहेत. प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर आर. आर. पाटील यांच्या सारखं काम करण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात मोठं आव्हान शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं आहे. युवक वर्गाचे प्रश्न आहेत. या मुद्यांवर काम करावे लागेल, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.

कोण आहेत शशिकांत शिंदे? (Who is Shashikant Shinde?)

शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. वडील जयवंतराव शिंदे आणि आई कौसल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले. लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय झाले. 1999 साली शशिकांत शिंदे यांनी प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 12,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. शशिकांत शिंदे हे दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यानंतर दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते. मात्र, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव महेश शिंदे यांनी केला. त्यानंतर शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2024 ची विधानसभेची निवडणुक देखील शशिकांत शिंदेंनी लढवली. मात्र पुन्हा शिवसेना शिंदे गटाच्या महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत. आता त्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार आहे.

संबंधित बातमी:

Eknath Shinde On Sanjay Shirsat And Sanjay Gaikwad: एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट अन् संजय गायकवाडांना कडक शब्दात सांगितले; म्हणाले, तुमच्या वागणुकीमुळे...

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti Shakti Peeth Sangli: 'खाकी वर्दीतील दरोडेखोर, जनरल डायरच्या औलादी!' शक्तीपीठ महामार्गासाठी सांगलीत जमीन मोजणीवरून राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल, म्हणाले, 'रात्री २ वाजल्यापासून पोलिसांचा पहारा...'
'खाकी वर्दीतील दरोडेखोर, जनरल डायरच्या औलादी!' शक्तीपीठ महामार्गासाठी सांगलीत जमीन मोजणीवरून राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल, म्हणाले, 'रात्री २ वाजल्यापासून पोलिसांचा पहारा...'
MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात इशारा!
मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात इशारा!
PM Narendra Modi: सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा पंडित नेहरुंचा विक्रम आज नरेंद्र मोदींच्या नावावर; तिसऱ्या कार्यकाळालाही 2 वर्षे पूर्ण
सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा पंडित नेहरुंचा विक्रम आज नरेंद्र मोदींच्या नावावर; तिसऱ्या कार्यकाळालाही 2 वर्षे पूर्ण
सांगली सातारा विधानपरिषद निवडणूक! दोन्ही राजांना विचारात न घेताच निर्णय घेतले जात असावेत, जयंत पाटलांचा टोला
सांगली सातारा विधानपरिषद निवडणूक! दोन्ही राजांना विचारात न घेताच निर्णय घेतले जात असावेत, जयंत पाटलांचा टोला

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात इशारा!
मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात इशारा!
Maharashtra School: राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
America missile attack on Iran: इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडलं, अमेरिकेचा होमुर्झवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा, युद्ध पुन्हा भडकणार?
इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडलं, अमेरिकेचा होमुर्झवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा, युद्ध पुन्हा भडकणार?
Vasai Crime News: इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार, रात्री 10.45 वाजता काय घडलं?
इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार
Maharashtra Live blog updates: विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, उर्वरित शाळा 15 जूनपासून; शिक्षण विभागाकडून निर्णयात बदल
Maharashtra Live blog updates: विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, उर्वरित शाळा 15 जूनपासून; शिक्षण विभागाकडून निर्णयात बदल
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरुन राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरुन राहल गांधींचा हल्लाबोल
Embed widget