एक्स्प्लोर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांची घोषणा; पुलवामामधून इश्तियाक अहमद घड्याळ चिन्हावर लढणार

अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू- काश्मीरमध्ये निवडणूकपूर्व हालचाली सुरू केल्या आहेत.

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महाराष्ट्र दौरा सुरु झाला असून राज्यात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते महिला भगिनींशी संवाद साधत आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेथेही निवडणुकीच्या मैदानात उतरला असून राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) संसदीय मंडळाने पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात निवडणूक लढवण्यासाठी तीन उमेदवारांच्या नावांना मान्यता दिली आहे. त्यानुसार, त्राल मतदारसंघातून मोहम्मद युसूफ हजम, पुलवामा विधानसभा क्षेत्रातून इश्तियाक अहमद शेख आणि राजपुरा विधानसभेसाठी (Vidhansabha) घड्याळाच्या चिन्हावर अरुण कुमार रैना यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे इतर कुठल्याही पक्षाशी युती न करता राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक लढवत आहे, असेही ब्रीजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले. जम्मू-काश्मीर (Jammu kashmir) विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यानुसार 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात एकूण 24 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे इतर उमेदवारांची नावे आणि इतर संबंधित माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले

25 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा (Vidhansabha) निवडणुक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू- काश्मीरमध्ये  निवडणूकपूर्व हालचाली सुरू केल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 25  स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी जाहीर केलेल्या यादीत पक्षाच्या 25 प्रमुख नेत्यांचा समावेश असून या भागातील निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. या यादीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यासह महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, एस. आर. कोहली, ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि जम्मू आणि काश्मीर प्रदेशाध्यक्ष डॉ. तारिक रसूल आदी प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेपूर्वी काँग्रेसला हादरा, आणखी एक आमदार भाजपमध्ये जाणार? गडकरींच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
विधानसभेपूर्वी काँग्रेसला हादरा, आणखी एक आमदार भाजपमध्ये जाणार? गडकरींच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Pune News: विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा घुमणार ‘आवाज’; ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवरील मर्यादेला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती
विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा घुमणार ‘आवाज’; ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवरील मर्यादेला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती
Nashik Accident News : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
Yojanadoot : शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करा अन् दरमहा 10 हजार मिळवा, योजनादूतसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी
योजनादूतला तुफान प्रतिसाद, 50 हजार जागांसाठी आतापर्यंत 1 लाख 20 हजार अर्ज, नोंदणी करण्याची शेवटची संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar : Nitesh Rane यांची जीभ घसरली; अजितदादा म्हणतात,वादग्रस्त वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाही100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 September 2024TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 13 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेपूर्वी काँग्रेसला हादरा, आणखी एक आमदार भाजपमध्ये जाणार? गडकरींच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
विधानसभेपूर्वी काँग्रेसला हादरा, आणखी एक आमदार भाजपमध्ये जाणार? गडकरींच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Pune News: विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा घुमणार ‘आवाज’; ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवरील मर्यादेला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती
विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा घुमणार ‘आवाज’; ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवरील मर्यादेला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती
Nashik Accident News : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर
Yojanadoot : शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करा अन् दरमहा 10 हजार मिळवा, योजनादूतसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी
योजनादूतला तुफान प्रतिसाद, 50 हजार जागांसाठी आतापर्यंत 1 लाख 20 हजार अर्ज, नोंदणी करण्याची शेवटची संधी
Lalbaugcha Raja: 'लालबागचा राजा'च्या मंडपात अभिनेत्रीला बाउंसरकडून धक्काबुक्की, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Video : 'लालबागचा राजा'च्या मंडपात अभिनेत्रीला बाउंसरकडून धक्काबुक्की, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Embed widget