Supriya Sule: हाती नवऱ्याचा फोटो, समोर लेकीचं भाषण; बारामतीत पोरीसाठी पदर खेचून आई मैदानात
सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेण्यात आली. या सभेत आमदार रोहित पवार भावुक झाल्याचं दिसून आलं. शरद पवारांनी त्यांच्यासोबत केलेल्य संवादाची आठवण सांगताना रोहित पवार भावुक झाले होते.
![Supriya Sule: हाती नवऱ्याचा फोटो, समोर लेकीचं भाषण; बारामतीत पोरीसाठी पदर खेचून आई मैदानात Husband Sharda pawar's photo in hand, supriya sule speech in front; In Baramati, the mother pratibha pawar pulls the cover for lok sabha election Supriya Sule: हाती नवऱ्याचा फोटो, समोर लेकीचं भाषण; बारामतीत पोरीसाठी पदर खेचून आई मैदानात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/ec3882918027e118263c2c56dd003ea317149900803631002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बारामती : लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या 7 मे रोजी मतदान होत आहे. राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) उद्या मतदान होत असून बारामती, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, माढ्यासह विविध मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. तत्पूर्वी रविवारी दुपारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यावेळी, बारामतीमध्ये (Baramati) पवार कुटुंब सभांच्या माध्यमातून आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जंगी सभा घेतली. तर, शरद पवार यांनीही लेकीच्या प्रचारासाठी बारामती गाजवली. यावेळी, सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंब प्रचारसभेला उपस्थित होतं. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या आई प्रतिभा पवार ह्यही शरद पवारांचा फोटो हाती घेऊन लेकीला बळ देत होत्या.
सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेण्यात आली. या सभेत आमदार रोहित पवार भावुक झाल्याचं दिसून आलं. शरद पवारांनी त्यांच्यासोबत केलेल्य संवादाची आठवण सांगताना रोहित पवार भावुक झाले होते. तर, रोहित यांच्या या भावनिक प्रसंगाची अजित पवारांनी भरसभेत खिल्ली उडवली. माात्र, सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार यांसह पवार कुटुंबातील अनेक सदस्य सभेला दिसून आले. त्यामध्ये, सर्वात महत्वाचं म्हणजे पती शरद पवार यांचा फोटो हाती घेऊन प्रतिभा पवारही सभास्थळी समोर बसल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत लेकीला पाठबळ देण्यासाठी आई पदर खेचून मैदानात होती. तर, वडिल शरद पवार हेही भाषणातून बारामतीकरांना साद घालत होते.
प्रतिभा पवार यांचा फोटो व्हायरल
प्रतिभा पवार यांचा बारामतीच्या सभेतील एक फोटो व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हा फोटो शेअर करण्यात येत असून प्रतिभा पवार लेकीसाठी पदर खेचून प्रचारात उतरल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, बारामतीमधील सभेत बोलताना शरद पवार यांचा घसा बसला होता, शब्द फुटेना गेले, त्यांचा आवाज कातर झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, तरीही लेकीसाठी शरद पवारांनी 4 ते 5 मिनिटांचं भाषण करुन बारामतीकरांना आवाहन केलं.
कार्यकर्ते नेते अशा अनेकांच्या हातात आपण अनेक वेळा साहेबांचे फोटो पाहिलेत हा फोटो खूप स्पेशल आहे कारण तो फोटो स्वतः साहेबांच्या पत्नी प्रतिभा काकींच्या हातात आहे..
— yogesh sawant (@yogi_9696) May 6, 2024
ज्याच्यावर मुलासारखं प्रेम केलं तो सोडून गेला ज्यानं मोठं केलं त्यालाच संपवायला निघाला पण पत्नी म्हणून काकी या… pic.twitter.com/xOQZoSHg86
शरद पवार बारामतीतच बजावणार मतदानाचा हक्क
शरद पवार यांनी गेल्या 20 दिवसांत तब्बल 52 सभा घेतल्य असून दिवसरात्र फिरुन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला आहे. त्यामुळे, प्रचारसभांच्यौ दौऱ्याच ताण पडल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने सध्या ते आराम करत आहेत.डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी आजच्या दिवसातील त्यांचे सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. बीड दौरा आणि पुण्यातील आजची सभा रद्द करुन शरद पवार आज बारामतीतच आहेत. उद्या 7 मे रोजी ते बारामतीमध्येच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)