एक्स्प्लोर

भाजपला दे धक्का... हर्षवर्धन पाटलांच्या लेकीनं स्टेटस ठेवलं; चंद्रकांत पाटलांनीही स्पष्टच सांगितलं

"आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा", अशा आशयाचे बॅनर इंदापुरात काही दिवसांपूर्वीच झळकले आहेत.

पुणे : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) यांच्या पक्षाचा सहभाग झाल्यामुळे भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच गोची झाली आहे. कारण, महायुतीमधील नियमाप्रमाणे विद्यमान आमदाराची जागा त्या त्या पक्षाला सुटणार आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी निवडणुकांसाठीच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता मावळली असून त्यांनी तुतारी हाती घेण्याचं निश्चित केलंय. आता, पुढील 4 ते 5 दिवसांत हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आजच शरद पवारांची भेट घेतली असून त्यांच्या लेकीने स्टेटवर तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याचं दिसून आलं. 

"आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा", अशा आशयाचे बॅनर इंदापुरात काही दिवसांपूर्वीच झळकले आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावले असल्याची चर्चा आहे. यापूर्वी हर्षवर्धन पाटील दोन वेळेस विमान चिन्हावर अपक्ष निवडणूक लढले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुतारीच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली असून उद्याच पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या प्रवेशाची घोषणा करतील. दुसरीकडे त्यांची कन्या अंकिता यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

पुढील 4 दिवसांत हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील यांचा तुतारीत प्रवेश होणार असून भाजपनेही त्यांच्या या दाव्यावर स्पष्टपणे भूमिका मांडली. राजकारणात महत्वकांक्षा असतात, हर्षवर्धन पाटलांचं चुकीचं सुरू आहे असं मी म्हणणार नाही. पण माझं म्हणणं आहे की, एक पक्षात राहण्याचे समाधान वेगळं असतं, असे म्हणत एकप्रकारे चंद्रकांत पाटील यांनीही हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप सोडण्याचे संकेत दिले आहेत.  

2019 मध्ये कोणाला किती मतं? 

हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दत्तात्रय भरणे यांना त्यांच्याविरोधात मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. दत्तात्रय भरणे यांनी 114,960 मतं खेचून आणली होती. तर हर्षवर्धन पाटलांना 111,850 मतं पडली होती. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा 3,110 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांच्यामधील संघर्ष गेल्या 5 वर्षात वाढला आहे. इंदापूरमधील नेत्यांचे कार्यकर्ते मला त्रास देतात, अशा आशयाचे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते. 

हेही वाचा

पोलिसांकडून बेड्या, किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर कोण?, रिलस्टार, युट्युबवर फेमस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget