(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gulabrao Patil : '...तेव्हा माझ्या वडिलांनी मला बदडलं होतं', मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला किस्सा
Gulabrao Patil : गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगावात सायकल वाटप करण्यात आले, त्यावेळी त्यांनी किस्सा सांगितला आहे.
Gulabrao Patil, जळगाव : "सायकलची मला पण आवडते. लहानपणी एकदा भाड्याने सायकल घेतली. 50 पैसे तेव्हा भाडं होतं. अर्ध्या तासाच भाडं होतं, मात्र मी एक तास सायकल फिरवली आणि 25 पैसे दिले. त्यामुळे सायकल वाल्याने माझ्या वडिलांना तक्रार केली. मग माझ्या वडिलांनी मला खूप बदडलं होतं" असा किस्सा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितला. गुलाबरावजी पाटील फाउंडेशन तर्फे पहिल्या टप्प्यात जय बालाजी ग्रुपच्या सहकार्याने जळगाव ग्रामीण मधील 500 गरजू व होतकरू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले, वडिलांचा मार खाणारा गुलाबराव पाटील आज बहिणींना सायकल वाटप करतो. हीच मोठी आनंदाची बाब आहे. बरेच राजकारणी लोक माझ्यावर टीका करतात आणि मी सायकल देतो तुम्ही टायर तर देऊन बघा. कपाळ करंट्यानहो तुम्हाला करता आलं नाही. तुम्हाला फक्त मजूर फेडरेशनचं कमिशन घेता येतं बाकी दुसरं काही करता येत नाही.
कमिशनमधून थोडं वाट न बाबा दोन हजारांची पावती फाडतो आणि चार वेळेस मोबाईल आणि व्हाट्सअप वर टाकतो. या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची राजकीय विरोधक गुलाबराव देवकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
गुलाबराव पाटलांनी गरिबी पाहिलेली आहे. चटणीवर पाणी खाणारा हा गुलाबराव पाटील आहे. प्रारब्धात असेल तर सगळं काही मिळेल. नशिबात असेल तर छप्पर फाडके देगा. त्याला कोणाला सांगायची गरज नाही. माझी मुलगी माझी खूप काळजी घेते. ज्यांना मुलगी नाही, त्यांना विचारा मुलगी काय असते. माणसाला मुलगी असली पाहिजे. मुलगी ही आईचं रूप आहे, मुलगी ही बहिणीचे रूप आहे. मुलगी ही देवीच रूप आहे.
नराधम जे काम करतायहेत ना ते अत्यंत चुकीचं काम करत आहेत. त्यामुळे घरातल्या मुलाकडे दुर्लक्ष झाले तर चालेल पण मुलीकडे लक्ष द्या. तिच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्याचाराच्या वाढता घटना लक्षात घेऊन उपस्थितांना आवाहन केलं.
गुलाबराव पाटील म्हणाले, आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महिलांनी मुलांसाठी खूप काही केला आहे. हे सरकार सुद्धा मुली आणि महिलांच्या पाठीशी उभा आहे. लाडकी बहिण योजना, महिलांना अर्ध टिकीट केल. मोठ्या आनंदात महिला भगिनी बसने प्रवास करतात. एकनाथ शिंदेने केलं दाढीवाल्याने.. ते बी दाढीवाले नरेंद्र मोदी बी दाढीवाले... आणि गुलाबराव दाढीवाले..लाईन लगी है सब...
देशातला एकमेव राज्य आहे की ज्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. लाडकी बहीण योजना सुरू केली. पैसे मिळणार नाही असं सांगितलं जात होतं. मात्र पैसे मिळाले आता म्हणतात निवडणुकीनंतर योजना बंद होईल. असा कोणता मुख्यमंत्री आहे की तो 13 वेळेस एका जिल्ह्यामध्ये येतो. मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये आला त्याचं नाव एकनाथराव शिंदे आहे. देण्याची दनात माझ्या नेत्यांमध्ये आहे आणि हेच गुण आमच्यामध्ये आहेत, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या