एक्स्प्लोर

Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होऊ शकतात, हिमाचल प्रदेशसोबतच जाहीर होऊ शकतात निकाल

Gujarat Election 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. अशातच आता गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरच्या अखेरीस होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Gujarat Election 2022: हिमाचलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून आता गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरच्या अखेरीस होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Election) दोन टप्प्यात मतदान होऊ शकते. पहिला टप्पा नोव्हेंबरच्या शेवटी आणि दुसरा टप्पा 4-5 डिसेंबरच्या आसपास मतदान होऊ शकते. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसोबत गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणीही 8 डिसेंबरला होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 14 व्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपणार आहे. यापूर्वी 182 जागांच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर 2017 मध्ये (Gujarat Election 2017) झाल्या होत्या. निवडणुकीत विजय मिळवून भाजपने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले आणि विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन केली होती.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Election) आयोगाने पूर्ण तयारी केलीय असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आयोग कधीही याची घोषणा करू शकतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या अनेक पथकांनी गुजरातला भेट दिली असून त्यांनी परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला आहे. दुसरीकडे गुजरातमधील सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे.

गुजरातमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजप सरकार गुजरातमध्ये सत्ता टिकवण्यासाठी गौरव यात्रा काढत आहे. दुसरीकडे गुजरातच्या भाजप सरकारला आव्हान देण्यासाठी आम आदमी पक्ष सज्ज झाला आहे. त्याचबरोबर भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी काँग्रेसही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

2017 मध्ये कोणाला किती जागा मिळाल्या? (Gujarat Election 2017)

गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत. त्यापैकी 40 जागा राखीव आहेत. यापैकी 13 जागा अनुसूचित जातीसाठी तर 27 जागा अनुसूचित जमाती आदिवासी समाजासाठी राखीव आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी काँग्रेसच्या खात्यात 77 जागा आल्या. याशिवाय भारतीय आदिवासी पक्षाला 2 जागांमध्ये 1 जागा, राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली. तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Asaduddin Owaisi:पाकिस्तानात जाण्यास नकार देणारी टीम पाकविरुद्ध सामने खेळते, असदुद्दीन ओवैसींकडून भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रश्न उपस्थित

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: जयंत पाटलांची गुगली! मोदींच्या आवाहनावरून मुख्यमंत्र्यांनाच घेरलं, म्हणाले, पंतप्रधानांचा आदेश मानून गाड्यांची संख्या कमी करा, फक्त एक गाडी अन् एक अंगरक्षक...
जयंत पाटलांची गुगली! मोदींच्या आवाहनावरून मुख्यमंत्र्यांनाच घेरलं, म्हणाले, पंतप्रधानांचा आदेश मानून गाड्यांची संख्या कमी करा, फक्त एक गाडी अन् एक अंगरक्षक...
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
Rupali Chakankar ED Inquiry : दोन दिवसांआधी SIT चौकशी; आज रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स, भोंदू अशोक खरात प्रकरणी मोठी घडामोड
दोन दिवसांआधी SIT चौकशी; आज रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स, भोंदू अशोक खरात प्रकरणी मोठी घडामोड
Tamilnadu CM Vijay Thalapathy : भ्रष्ट राजकारण्यांना हरवणारा 'नायक' आता सत्तेच्या खुर्चीवर; विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाची सातासमुद्रापार चर्चा, 'या' देशाच्या पंतप्रधान म्हणाले, 'एका बोटाची क्रांती'...
भ्रष्ट राजकारण्यांना हरवणारा 'नायक' आता सत्तेच्या खुर्चीवर; विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाची सातासमुद्रापार चर्चा, 'या' देशाच्या पंतप्रधान म्हणाले, 'एका बोटाची क्रांती'...

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
Embed widget