भगवा आमचा स्वाभिमान, उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिलेला नाही, त्यांचा संबंध आता...; गोपिचंद पडळकरांचा हल्लाबोल
Lok Sabha Election 2024: भगवा आमचा स्वाभिमान आहे. ठाकरे यांचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही. त्यांचा संबंध आतां हिरव्याशी आहे, याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यबर नक्कीच होईल, असं गोपिचंद पडळकर म्हणाले आहेत.
Gopichand Padalkar on Uddhav Thackeray : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा सुपुत्र इतक्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं, असं म्हणत धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, भगवा आमचा स्वाभिमान आहे. ठाकरे (Thackeray Group) यांचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही. त्यांचा संबंध आतां हिरव्याशी आहे, याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यभर नक्कीच होईल, असंही गोपिचंद पडळकर (MP Gopichand Padalkar) म्हणाले आहेत.
धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा सुपुत्र इतक्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं. भगवा आमचा स्वाभिमान आहे. ठाकरे यांचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही. त्यांचा संबंध आतां हिरव्याशी आहे. याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यभर होईल."
जे मोदींना विरोध करतायत, त्यांचा अवाका किती? गोपिचंद पडळकरांचा सवाल
"देशात आणि राज्यात जे लोकं मोदींना विरोध करत आहेत. त्यांचा अवाका किती आहे? त्यांना खूप मर्यादा आहेत. ज्या पद्धतीनं डबक्यातले बेडूक डराव डराव करतात, त्याच पद्धतीनं ही लोकं महाराष्ट्रात बोलत आहेत. मला राज्यातील जनतेला विनंती करायची आहे. यांना प्रचंड मर्यादा आहेत. यांच्या नादाला लागून काही उपयोग नाही. चार जूननंतर यांची तोंडं काळी झाल्याशिवाय राहणार नाहीत.", असंही वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
पाहा व्हिडीओ : Gopichand Padalkar on Uddhav Thackeray :बाळासाहेबांचा सुपुत्र खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं