एक्स्प्लोर

गोकुळमध्ये सत्तापालट होणार? अरुण डोंगळेंनी महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारली, हसन मुश्रीफ म्हणाले...

Gokul Dudh Sangh Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठ्या असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघात सत्तापालट होण्याची चिन्हं आहेत.

Gokul Dudh Sangh Kolhapur :  गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दुध संघाचं (Gokul Dudh Sangh Kolhapur) राजकारण चांगलंच तापलंय. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या भूमिकेमुळे गोकुळमध्ये सत्तापालट होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसलीये. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठ्या असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ  (Gokul Dudh Sangh Kolhapur)  म्हणजे "गोकुळ".....याच गोकुळ दुध संघाच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतलीये. 

गोकुळ दुध संघावर काँग्रेस नेते सतेज पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. अरुण डोंगळे आत्तापर्यंत अध्यक्ष होते. मात्र, आता महायुतीने सत्तापालट करण्यासाठी लक्ष घातल्यानंतर गोकुळचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या अरुण डोंगळेंच्या भूमिकेमुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण आता चांगलं तापलंय. गोकुळ दुध संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतली आहे.

अरुण डोंगळे यांना गोकुळच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीची हाव सुटली : हसन मुश्रीफ 

कोल्हापुरातील आतापर्यंत सुरु असलेल्या गटातटाच्या राजकारणात आता गोकुळच्या दुधाला राजकीय उकळी फुटली आहे. गोकुळ दुध संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतली आहे. अरुण डोंगळेंच्या भूमिकेमुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण आता चांगलं तापलंय. दरम्यान, अरुण डोंगळे यांना गोकुळच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीची हाव सुटली असून त्यांना ती खुर्ची सोडवेना अशी टीका स्वतः मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्याऐवजी गोकुळच्या बैठकीलाच दांडी मारली

एकवेळ आमदारकी नको पण गोकुळचा संचालक करा, असं कोल्हापुरात म्हटलं जातं. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात म्हणजेच गोकुळमधील आयता अध्यक्ष घेऊन, महायुतीचे लेबल लावण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान, त्यामुळे पायउतार होणारे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्याऐवजी गोकुळच्या बैठकीलाच दांडी मारून महायुतीला साथ देण्याचे पसंत केले आहे.  आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दुध संघातील सत्तेच्या चाव्या महायुतीकडे ठेवण्यासाठी महायुतीने प्रयत्न सुरु ठेवले आहेत. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. अध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर डोंगळे यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिलाय.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. धनंजय महाडिकांचे हे प्रयत्न आता यशस्वी होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गोकुळमध्ये सत्ता पालट होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग, अरुण डोंगळेंची बैठकीला दांडी, सतेज पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले...

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी

व्हिडीओ

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशिया-इराण-पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी, भारताचं काय?  
पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना अमेरिकेची दारं बंद, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, 21 जानेवारीपासून अंमलबजावणी
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Embed widget