एक्स्प्लोर

Girish Mahajan Profile : विद्यार्थी जीवनात तळागाळातील कार्यकर्ता, सलग सात टर्म आमदार; आता पुन्हा गिरीश महाजनांची कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी

Girish Mahajan : भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. गिरीश महाजन यांनी ही आज नागपुरात पार पडलेल्या शपथिवधी सोहळ्यात मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Girish Mahajan Profile in Marathi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारमधी मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) नागपुरात पार पडला आहे. या शपथिवधी सोहळ्यात भाजपकडून प्रथम क्रमांकाची शपथ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ यांनी, तर शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे महायुती सरकारमध्ये भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर बावनकुळे वरिष्ठ नेते असतील. राष्ट्रवादीमध्ये हसन मुश्रीफ, तर गुलाबराव पाटील हे शिंदे सेनेमध्ये नेते असतील. दरम्यान, यावेळी मंत्रीपदांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला असून तब्बल 19 चेहरे मंत्रीपदामध्ये नवीन चेहरे असणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे महायुतीमध्ये मंत्रीपदामध्ये भाकरी फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. 

एबीव्हीपीचा कार्यकर्ता ते पुन्हा कॅबिनेट मंत्री

अशातच, भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. गिरीश महाजन यांनी ही आज नागपुरात पार पडलेल्या शपथिवधी सोहळ्यात मंत्री पदाची शपथ घेतली आहे.  गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील ऐंशीच्या दशकातील राजकारणी आहेत. ते जामनेरचे विद्यमान आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस (Girish Mahajan) यांच्या मंत्रिमंडळात (2014-19) ते जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण आणि महाराष्ट्र राज्याचे पाटबंधारे मंत्री होते. गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघाचे 14 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असून सलग साहव्यांदा ते काम करत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून महाजन यांनी एबीव्हीपीच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्ता म्हणून राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. दरम्यान, गिरीश महाजन यांचा राजकीय प्रवास तेवढाच खडतर राहिला आहे.  

तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ

महायुती सरकारमधील मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्‍यांचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी पार पडल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात गिरीश महाजन यांनी देखील तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली. गिरीश महाजन यांचा राजकारणात प्रवेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून झाला. त्यांनी  १९८१ ते १९८३  या काळात जनरल सेक्रेटरी (जी. एस.), आर्ट्स, सायन्स व  वाणिज्य महाविद्यालय, जामनेर (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) येथे पद भूषविले होते.

त्यानंतर त्यांनी १९८८ ते १९९०  या काळात  भारतीय जनता युवा मोर्चा, जामनेर तालुक्याचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पहिले. त्यानंतर १९९० ते १९९३ या काळत तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, जामनेर तालुका हे पद भूषविले. तर १९९२ साली ते जामनेर ग्रामपंचायतचे सरपंच झाले. त्यानंतर १९९३ ते १९९५  या कालावधीत जळगाव जिल्ह्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केले 

यानंतर १९९५ ते १९९९  या काळात ते जामनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.  
तसेच १९९५ ते १९९७  या काळात त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा आणि महाराष्ट्र प्रदेशचे कामकाज बघितले. तर १९९९ ते २००४ या काळात ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००४ ते २००९ या काळात तिसऱ्यांदा तर  २००९ ते २०१४  या कालावधीत चौथ्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१४ ते २०१९  पाचव्यांदा आणि २०२४ मध्ये ते पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 

तर महाजन यांनी २०१४ ते २०१९ या काळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले असून त्यात त्यांनी  जलसंपदा, खारभूमी व लाभक्षेत्र विकास विकास, वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता (अतिरिक्त प्रभार) या खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. तर २०१४ ते २०१९  या काळात नाशिक, नंदुरबार आणि  जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कामकाज केले आहे. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Embed widget